सटाण्यात वाळूमाफियांचे धाबे दणाणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 01:01 AM2018-09-16T01:01:59+5:302018-09-16T01:03:34+5:30
सटाणा येथे नव्याने रु जू झालेले तहसीलदार प्रमोद हिले यांनी वाळू तस्करीविरु द्ध धडक मोहीम हाती घेतली आहे. तहसीलदार हिले यांच्या पथकाने वाळूची तस्करी करणाऱ्या एका डंपरसह ट्रॅक्टर पकडून साडेसहा लाख रु पये दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
सटाणा : येथे नव्याने रु जू झालेले तहसीलदार प्रमोद हिले यांनी वाळू तस्करीविरु द्ध धडक मोहीम हाती घेतली आहे. तहसीलदार हिले यांच्या पथकाने वाळूची तस्करी करणाऱ्या एका डंपरसह ट्रॅक्टर पकडून साडेसहा लाख रु पये दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
शहर व तालुक्यात वाळूमाफियांनी धुमाकूळ घातला आहे. त्याला काही पुढारी, महसूल व पोलीस यंत्रणेच्या कृपाशीर्वादाने ही तस्करी खुलेआम सुरू आहे. याबाबत शेतकºयांच्या मोठ्या प्रमाणात तक्र ारी वाढल्याने तहसीलदार प्रमोद हिले यांनी गंभीर दखल घेतली आहे. वाळू तस्करी विरु द्ध हिले यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत नंदुरबारकडून तापीच्या वाळूची चोरटी वाहतूक करणारा डंपर नाशिककडे जात असल्याची माहिती मिळाली होती. हिले यांनी येथील यशवंतनगरजवळ सापळा रचून वाळूने भरलेला डंपर (एमएच १८ एए ६७५६) पकडून ताब्यात घेतला आहे. वाळूची चोरटी वाहतूक करणाºया या डंपर मालकाला साडेचार लाख रु पयांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान, ब्राह्मणगाव येथे नंबर नसलेले महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर वाळूची चोरटी वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. महसूल विभागाच्या अधिकाºयांनी रंगेहाथ पकडून जप्त केले आहे. त्याला दीड लाख रु पयांचा दंड ठोठावला आहे.
खुलेआम वाळूची तस्करी
ठेंगोडा नदीपात्र तसेच आरम नदीपात्रातून दररोज मध्यरात्र ते पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान पन्नासहून अधिक ट्रॅक्टरने वाळूची खुलेआम तस्करी केली जाते. आराई, सटाणा, मुंजवाड, ठेंगोडा येथील वाळू माफियांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. पाच हजार रु पये ट्रॉली या भावाने ही चोरीची वाळू शहरात विक्र ी केली जात आहे. शहरातील शिवाजी पुतळा, बसस्थानक तसेच ताहाराबाद नाका येथे पोलिसांचे गस्त पथक असते. या पथकाच्या आजूबाजूलाच वाळू माफियांची टोळी देखील सतर्क असते. हा सर्व काळाबाजार यंत्रणेच्या साक्षीने घडूनही वाळू माफियांवर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.