देवळा तालुक्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 12:26 AM2021-06-02T00:26:04+5:302021-06-02T00:26:32+5:30
देवळा : देवळा तालुक्यातील १७ गावे पूर्णपणे कोरोना मुक्त झाली असून उर्वरीत गावात ११७ कोरोना रूग्ण सद्या उपचार घेत असल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी दिली आहे.
देवळा : देवळा तालुक्यातील १७ गावे पूर्णपणे कोरोना मुक्त झाली असून उर्वरीत गावात ११७ कोरोना रूग्ण सद्या उपचार घेत असल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी दिली आहे.
तालुक्यात कोरोना बाधित झालेले सर्वाधिक रूग्ण सरस्वतीवाडी येथे १५, खर्डा १० व देवळा येथे ९ रुग्ण सद्या उपचार घेत आहेत. उर्वरीत गावात रूग्णसंख्या अल्प आहे.
देवळा तालुक्यातील कोरोना मुक्त झालेली गावे ...
चिंचवे, रामनगर, म.फुलेनगर, वऱ्हाळे, गिरणारे, कुंभार्ड, कांचणे, शेरी, मटाणे, वरवंडी, भिलवाड, वडाळे, माळवाडी, फुले माळवाडी, विजयनगर, महाल पाटणे, देवपुरपाडा.
चौकट...
अनेक संशयित रुग्ण कोरोना चाचणी करतांना स्वतःचे खरे नाव व गाव लपवून चुकीचे नाव व गावाची माहीती देत असल्यामुळे हे संशयित रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर सदर गावाचे नाव बदनाम होत असल्याच्या तक्रारी देवळा, वाजगाव, दहिवड आदी गावातील नागरीकांनी केल्या आहेत. असे चुकीचे नाव व पत्ते देणाऱ्या पॉझिटीव्ह रुग्णांचा शोध घेतांना आरोग्य विभागाचे कर्मचारी त्रस्त होत आहेत. यामुळे संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करतांना त्याचे नाव व गावाची आरोग्य विभागाने खात्री करून द्यावी अशी मागणी नागरीकांनी केली आहे.
देवळा तालुका कोरोना अपडेट ...
१ जुन २०२१ सायंकाळी - ५ वाजता
१) तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या - ७२३६
२) आज आढळून आलेले नवीन रूग्ण - ०२
३) नगरपरिषद क्षेत्र - १३८६
४) ग्रामपंचायत क्षेत्र - ५८५०
५) बरे झालेली रुग्णसंख्या - ७०४९
६) आज बरे झालेली रुग्णसंख्या - ३८
७) मृत्यू - ७०
८) आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या - ०
९) उपचारखालील रुग्ण - ११७
१०) सीसीसी येथे दाखल - ५
११) डीसीएचसी येथे दाखल - ३४
१२) खाजगी रुग्णालयात दाखल - ४२
१३) गृह विलगिकरणात असलेले - ३६