पेलिकनचा तिढा सुटण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:39 AM2017-09-23T00:39:59+5:302017-09-23T00:40:05+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पेलिकन पार्कचा तिढा सुटण्याचा मार्गावर असून, या पार्कमध्ये मध्यवर्ती उद्यान (सेंट्रल पार्क) उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शुक्रवारी (दि. २२) पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली. या पार्कसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
सिडको : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पेलिकन पार्कचा तिढा सुटण्याचा मार्गावर असून, या पार्कमध्ये मध्यवर्ती उद्यान (सेंट्रल पार्क) उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शुक्रवारी (दि. २२) पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली. या पार्कसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. सिडकोच्या मध्यवस्तीत बंद स्थितीत असलेल्या पेलिकन पार्कची अवस्था डम्पिंग ग्राउंडसारखी झाली असून, सदर जागेत लोकोपयोगी प्रकल्प उभारावे, अशी मागणी सिडकोवासीयांकडून सातत्याने केली जात आहे. तसेच प्रत्येक निवडणुकीत राजकारण्यांकडून पेलिकन पार्कच्या प्रश्नावर मत मागितले जाते. परंतु प्रत्यक्षात मात्र प्रश्न सोडविला जात नसल्याने नागरिकांनी नाराजीचा सूर आहे. बंद अवस्थेतील पेलिकन पार्कच्या जागेत टाकण्यात येत असलेला कचरा व घाणीमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गेल्या दहा वर्षांहून अधिक कालावधीपासून बंद अवस्थेत व न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या पेलिकन पार्कचा निकाल हा मनपाच्या बाजूने लागला असल्याने या पार्कचा ताबा सद्यस्थितीत महापालिकेकडे आहे. पेलिकन पार्कच्या जागेवर सिडको वासीयांसाठी प्रकल्प उभारावा यासाठी आमदार सीमा हिरे यांनी संबंधित मंत्र्यांबरोबर मुंबई येथे बैठकही घेतली. या बैठकीत सिडकोतील भाजपा नगरसेवक मुकेश शहाणे, नीलेश ठाकरे, छाया देवांग हेदेखील उपस्थित होते. सदर जागेवर उद्यानाचेच आरक्षण असल्याने दुसरा प्रकल्प उभाण्यात येणार नसल्याचे मनपा सूत्रांकडून सांगण्यात आले.