सोशल मीडियामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न लागला मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 10:43 PM2020-04-07T22:43:41+5:302020-04-07T22:44:19+5:30
कोरोनाच्या भीतीने एकीकडे लॉकडाउन करण्याची वेळ आली आहे. यामुळे बेवारस व गरजूंना अन्नधान्याची अडचण भासू नये म्हणून अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत अन्नधान्य उपलब्ध करून देत आहेत, मात्र दुसरीकडे मोकाट, बेवारस व गोशाळेतील जनावरांच्या चाºयाचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे. त्यामुळे मुक्या प्राण्यांनाही जगविण्यासाठी सहकार्य करा, असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याची दखल पिंपळगाव येथील प्राणिमित्रांनी घेत भूतदयेचा संदेश देत नाशिक शहरातील गोशाळा व मोकाट जनावरांच्या चाºयाचा प्रश्न मार्गी लावला आहे.
पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या भीतीने एकीकडे लॉकडाउन करण्याची वेळ आली आहे. यामुळे बेवारस व गरजूंना अन्नधान्याची अडचण भासू नये म्हणून अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत अन्नधान्य उपलब्ध करून देत आहेत, मात्र दुसरीकडे मोकाट, बेवारस व गोशाळेतील जनावरांच्या चाºयाचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे. त्यामुळे मुक्या प्राण्यांनाही जगविण्यासाठी सहकार्य करा, असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याची दखल पिंपळगाव येथील प्राणिमित्रांनी घेत भूतदयेचा संदेश देत नाशिक शहरातील गोशाळा व मोकाट जनावरांच्या चाºयाचा प्रश्न मार्गी लावला आहे.
नाशिक शहरात आजमितीस तीन मोठ्या गोशाळा आहे. त्यात पंचवटी, तपोवन व पाथर्डी फाटा आदी ठिकाणचा समावेश आहे. रस्त्यावर फिरणारी मोकाट जनावरे व कत्तल करण्यासाठी असलेल्या गाई तेथे जमा केल्या जातात. आज शेकडो गाई याठिकाणी आहेत. त्यांच्या चारा पाण्यासाठी दानशूर व्यक्ती व प्राणिमित्र वेळोवेळी सहकार्य करीत असतात.
मात्र सध्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन व संचारबंदी असून, रहदारी व दळणवळण बंद झाल्याने या गोशाळांतील जनावरांना चाºयाचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. त्यासाठी तपोवन येथील कृषी गोशाळेच्या संचालिका रु पाली जोशी यांनी सोशल मीडियावर सामाजिक कार्यकर्ते व प्राणिमित्रांना चारा व पाण्यासाठी आवाहन केले होते. त्याची दखल पिंपळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ वायकंडे, रुपेश धुळे, सोमनाथ डंबाळे आदींनी घेत परिसरातून शेतकºयाच्या शेतातून चारा खरेदी केला व तो चारा कृषी गोशाळेसह परिसरातील मोकाट जनावरे तसेच पांजरापोळ आदी ठिकाणी दिला.
सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी असल्याने घराबाहेर निघणे मुश्कील आहे. अशावेळी जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. त्यासाठी सोशल मीडियावर कळविले असता पिंपळगाव बसवंत येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी कोणताही मोबदला न घेता एक गाडी चारा आणून देत जनावरांची सोय करून दिली आहे.
- रु पाली जोशी, कृषी गोशाळा, नाशिक
आजमितीस सर्व सजीवांना कोरोना विषाणूच्या संकटाने घेरले आहे. सगळीकडे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे काहींवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे, परंतु भूतदया जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कोणीही अन्नपाण्याविना दूर राहणार नाही. आम्हाला समजल्यानंतर आम्ही चारा घेतला व मोफत वितरित केला.
- सोमनाथ वायकंडे, प्राणिमित्र, पिंपळगाव बसवंत