आम्ही मालेगावकर समितीचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 10:44 PM2020-07-31T22:44:40+5:302020-08-01T01:08:36+5:30
आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे विविध मागण्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात येऊन कार्यकारी अभियंता राहुल पाटील यांना निवेदन देण्यात आले.
मालेगाव : येथील आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे विविध मागण्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात येऊन कार्यकारी अभियंता राहुल पाटील यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रा. के एन आहिरे, निखिल पवार, देवा पाटील यांनी मालेगाव शहरातील प्रमुख मार्ग सटाणा रोड, ६० फुटी
रोड व इतर रस्त्यांचे डांबरीकरण करावे, बांधकाम विभागाच्या वतीने
रस्ते विकासकामांमध्ये होत असलेल्या दिरंगाईची चौकशी करावी, कामांची गुणवत्ता तपासणी करून संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी, या मागण्यांसाठी एकदिवसीय आंदोलन केले.
महानगरपालिकेच्या हद्दीतील सटाणा रोड, कॅम्प रोड, ६० फुटी रोड व इतर काही प्रमुख रस्त्यांच्या विकासासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. या रस्त्यांच्या विकासाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आली आहे. सन २०१६-१७ पासून मनपा हद्दीतील शासन निधीतून विविध विकासकामे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पूर्ण केली जात आहेत. यातही दिरंगाई होत आहे. सटाणा नाका ते सोयगाव हा सटाणा रोड, ६० फुटी रोडवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीस प्रचंड त्रास होतो. रस्ता दुभाजकाला सुरक्षा पट्टे कलर करण्यात आलेले नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या मागण्यांचा निवेदनात समावेश
मालेगावी मागील वर्षी बनविण्यात आलेला कॉलेजरोडचा वरचा थर उखडला आहे. महानगरपालिकेच्या हद्दीतील सटाणा नाका ते सोयगाव (सटाणा रोड),
६० फुटी रोडचे डांबरीकरण करावे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्ते विकासकामांमध्ये होत असलेल्या दिरंगाईची चौकशी करण्यात येऊन ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून दंड वसूल करावा. कॉलेजरोड, कॅम्परोड, सटाणा रोड व इतर रस्त्यांची गुणवत्ता तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी कार्यकारी अभियंता राहुल पाटील यांनी आंदोलनकर्र्त्यांशी चर्चा केली.