आम्ही लेखिकाचे साहित्य संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 12:50 AM2019-03-22T00:50:55+5:302019-03-22T00:51:45+5:30
‘आम्ही लेखिका’ या अखिल भारतीय संस्थेच्या नाशिक शाखेचे महिला साहित्य संमेलन रविवारी (दि. २४) नाशिकमध्ये होणार आहे. दरम्यान, आम्ही लेखिका या संस्थेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
नाशिक : ‘आम्ही लेखिका’ या अखिल भारतीय संस्थेच्या नाशिक शाखेचे महिला साहित्य संमेलन रविवारी (दि. २४) नाशिकमध्ये होणार आहे. दरम्यान, आम्ही लेखिका या संस्थेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हा कार्यकारिणीत अध्यक्षपदी डॉ. प्रतिभा जाधव
यांची तर उपाध्यक्षपदी डॉ. मिलन कोहर यांची निवड करण्यात
आली आहे. तसेच सचिवपदी
स्वाती पाचपांडे, कोषाध्यक्षपदी स्वाती गायधनी, समन्वयकपदी सुमती टापसे तर संचालकपदी
रंजना शेलार, आरती डिंगोरे,
प्रतिभा पाटील, ज्योत्स्ना पाटील यांची निवड करण्यात आली
आहे.
दरम्यान, महिला साहित्य संमेलनासाठी ‘आम्ही लेखिका’चे संस्थापक अध्यक्ष मोहन कुलकर्णी (पुणे) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, संमेलनाचे उद्घाटन उद्योजक व साहित्यिक सुनीता बाफना (डहाणू) यांच्या हस्ते होणार आहे. महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रंजना शेलार यांची निवड झाली आहे. संमेलनात मुलाखत, एकपात्री प्रयोग, कथाकथन, कवयित्री संमेलन आदी सत्र होणार आहेत.