‘हम लोग मुहब्बत वाले हैं, खंजर क्यों लहराते हो...’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 04:32 PM2019-07-22T16:32:04+5:302019-07-22T16:34:10+5:30
कडासने यांनी ज्येष्ठ शायर इकबाल अशर यांनी लिहिलेली ‘उूर्द हैं मेरा नाम, मैं खुसरौ की पहेली, मैं मीर की हमराज, गालीब की सहेली...’ ही गझल सादर करून उूर्द भाषेचा प्रवास अधोरेखित केला.
नाशिक : तुम अपने अकीदो के नेजे हर दिल में उतारे जाते हो, हम लोग मुहब्बत वाले हैं, खंजर क्यों लहराते हों..., तहजीबो के लाखो फल आ जायेंगे, उर्दू का एक दरख्त लगा दो बस्ती में..., मुख्तसर दे दें, मोतेबर दे दें, इस तरह का हुनर दे दें..., अशा एकापेक्षा एक सरस उर्दू शेरोशायरीने ‘हमसफर’मध्ये उर्दू अदबची मैफल (मुशायरा) उत्तररोत्तर रंगली.
निमित्त होते, नंदकिशोर भुतडा फाउण्डेशनच्या वतीने गंगापूररोडवरील ‘हमसफर’मध्ये आयोजित ‘सहिफा-ए-मुहब्बत’ या उर्दू पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे. रविवारी (दि.२१) या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यानिमित्ताने जिल्ह्यातील मालेगाव, धुळे, जळगाव, भुसावळ, बुरहानपुर, मुंबई, पुणे आदि शहरांमधून उर्दू शायर उपस्थित होते. मंचावर अध्यक्षस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अधिक्षक सुनील कडासने तर प्रमुख पाहूणे म्हणून ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल, पार्वतीबाई भुतडा, शकील हसरत, डॉ. इकबाल बर्की आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी कडासने यांनी ज्येष्ठ शायर इकबाल अशर यांनी लिहिलेली ‘उूर्द हैं मेरा नाम, मैं खुसरौ की पहेली, मैं मीर की हमराज, गालीब की सहेली...’ ही गझल सादर करून उूर्द भाषेचा प्रवास अधोरेखित केला. तसेच त्यांनी हम लोग मुहब्बत वाले हैं..., ही गझल सादर करून उपस्थितांची दिलखुलास दाद मिळविली. यावेळी कवी राम पाठक, ज्येष्ठ उर्दू शायर आदम मुल्ला, जावेद अन्सारी, जिया बागपती, शकील हसरत, प्रास्ताविक अॅड.नंदकिशोर भुतडा यांनी केले. सुत्रसंचालन हारून उस्मानी यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत व परिचय सानवी भुतडा हिने केले व आभार शौनक भुतडा याने मानले.
या गझलांनी वाढविली रंगत
ज्येष्ठ शायर नासिर शकेब यांनी देख लीया ना लोगो तुमने मैने उजाले मांगे थे, रौशन हो गयी सारी बस्ती लेकिन हो गया अंधा मैं..., यकीन किजीये वो लोग अब भी मेरी नजर में बुरे नहीं हैं, जिन्होने चुन-चुन के लफ्ज फेके हैं जिंदगीभर खराब मुझपर..., जुबेर अली ताबीश यांनी मैं क्या बताऊं वो कितने करीब हैं मेरे, मेरा खयाल बी उसको सुनाई देता हैं..., मुस्ताक साहील यांनी हम ना सुधरेंगे तो..., अहद अमजद यांनी खोलकर जो बैंठे हैं, गीबतो के दरवाजे..., मैं इधर आऊंगा और आके उधर जाऊंगा, हाय ये दश्ते तमन्ना, यहीं मर जाऊंगा..., या गझला सादर करून मुशायरा रंगतदार केला.