कोरोनाला आम्ही घाबरणारे नाही; आत्महत्या घटल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:12 AM2021-04-29T04:12:03+5:302021-04-29T04:12:03+5:30
कोरोना आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे. नाशिक शहरासह ग्रामीण भागातसुध्दा महिनाभरापासून कोरोना वेगाने फैलावत गेल्यामुळे रुग्णसंख्येचा आलेख वेगाने उंचावल्याचे ...
कोरोना आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे. नाशिक शहरासह ग्रामीण भागातसुध्दा महिनाभरापासून कोरोना वेगाने फैलावत गेल्यामुळे रुग्णसंख्येचा आलेख वेगाने उंचावल्याचे दिसून येते. कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही अलीकडे वाढले होते. कोरोनाच्या या संकटात नाशिककर मात्र डगमगलेले नाहीत. या संकटात दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या बळावर नाशिककर कोरोनाशी झुंज देत आहेत. गेल्यावर्षी आयुक्तालयाच्या हद्दीत मार्च ते जुलै या कालावधीत ९८ नागरिकांनी मृत्यूला कवटाळले होते. यापैकी बहुतांश आत्महत्यांमागील कारणे समजू शकलेली नाहीत. तसेच २०१८ मध्ये तर तब्बल २७६ नागरिकांनी आत्महत्या केल्या होत्या. गेल्यावर्षीसुध्दा मार्चपासून कोरोनाचा विळखा घट्ट होण्यास सुरुवात झाली होती. तसेच राज्यासह देशभरात कडक लॉकडाऊनदेखील झाले होते, अशा स्थितीतसुध्दा नाशिककरांनी आपली मानसिकता सुदृृढ ठेवत कोरोनाचा मुकाबला केल्याचे यावरून असे स्पष्ट होते. यावर्षीही आत्महत्येचे प्रमाण आतापर्यंत कमीच राहिले आहे.
---इन्फो--
‘त्या’ घटनेने सारेच हळहळले
सातपूर भागातील श्रमिकनगरमधील पवार दाम्पत्यापैकी पत्नीला कोरोनाबाधित होऊन मृत्यू झाल्याचे दु:ख पचविता न आल्याने पती रवींद्र यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ३० मार्च रोजी घडली होती. या हृदयद्रावक घटनेने सातपुरच नव्हे, तर संपूर्ण शहर हळहळले होते. यावर्षीच्या कोरोनासाथीच्या काळातील ही घटना अत्यंत दुर्दैवी ठरली. गेल्यावर्षी नाशिकरोड भागात एका युवकाने कोरोनामुळे आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता.`
---इन्फो--
संकट माझ्या एकट्यावरच नाही...
कोरोनाचे आलेले संकट हे केवळ माझ्या एकट्यावरच नाही, तर संपूर्ण देशावर आणि जगावर आहे. या आजाराला घाबरण्याचे कारण नाही; कारण हा आजार वेळीच उपचार केल्यास नक्कीच बरा होणारा आहे. या आजारावर लस शोधण्यातसुध्दा भारतातील शास्त्रज्ञांना यश आले आहे आणि भारतीय लस ही प्रभावीसुध्दा आहे. या लसींच्या जोरावरच परदेशांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे घाबरून न जाता आवश्यक ती सर्व खबरदारी घेत कोरोनावर मात करण्याची इच्छाशक्ती बाळगणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. कोरोना हा आता नवीन राहिलेला नाही. आपले मन भक्कम ठेवल्यास कोरोनावर सहज विजय मिळविता येऊ शकतो, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ.मृणाल भारद्वाज यांनी सांगितले. मला कोरोना होणार नाही आणि झाला तरी मला काहीही होणार नाही, असा सकारात्मक विचार प्रत्येकाने करावा.
----आलेख---
...अशी आहे आत्महत्येची आकडेवार
२०१९-
२०२०
२०२१-
--
फोटो आर वर २८कोरोना/२८डेथ१/डमी फॉरमेट- २८कोरोना सुसाईड
===Photopath===
280421\28nsk_47_28042021_13.jpg~280421\28nsk_48_28042021_13.jpg
===Caption===
आत्महत्या घटल्या~आत्महत्या घटल्या