आम्ही ट्रोलिंगला घाबरत नाही, चंद्रकांत पाटलांनी ट्रोलर्संना ठणकावलं

By महेश गलांडे | Published: December 21, 2020 01:51 PM2020-12-21T13:51:05+5:302020-12-21T13:51:43+5:30

येत्या चार महिन्यात आपल्याकडचे किती आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील, हे तुम्हाला कळणारही नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत केला

We are not afraid of trolling, Chandrakant Patil slammed the opposition in nashik | आम्ही ट्रोलिंगला घाबरत नाही, चंद्रकांत पाटलांनी ट्रोलर्संना ठणकावलं

आम्ही ट्रोलिंगला घाबरत नाही, चंद्रकांत पाटलांनी ट्रोलर्संना ठणकावलं

Next

नाशिक - भाजपकडून राष्ट्रवादी आणि नंतर शिवसेनेत दाखल झालेले माजी आमदार बाळासाहेब सानप हे पुन्हा स्वगृही परतणार असल्याच्या चर्चा सुरू होती. नाशिक येथे त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब सानप यांचे स्वागत करताना, भाजपात काम केलेला माणूस इतर पक्षात रमतच नसल्याचे म्हटले. तसेच, विरोधकांकडून होणाऱ्या ट्रोलिंगबाबतही पाटील यांनी आपण घाबरत नसल्याचं सांगितलं.

येत्या चार महिन्यात आपल्याकडचे किती आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील, हे तुम्हाला कळणारही नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत केला. त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले. यातच भाजपामध्ये दहापेक्षा जास्त आमदार नाराज असून, राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती होणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनीही म्हटले होते. त्यामुळेच, पाटील यांनी विरोधकांकडून मुद्दामहून अशी विधाने केली जात असल्याचे सांगितले.  

पाटील यांनी नाशिक येथील पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवलं. तसेच, गेल्या वर्षभरापेक्षाही जास्त काळात कार्यकर्त्यांनी ज्या मेहनतीने काम ऊर्जेनं काम केलं ते कौतुकास्पद असल्याचं म्हटलं. दरम्यानच्या काळात एकही नेता, कार्यकर्ता पक्ष सोडून गेला नाही. विरोधकांच्या गप्पा पोकळ ठरल्या आहेत. विरोधकांच्या टीकेला आपण घाबरत नाही, सातत्याने माझ्यावर, देवेंद्र फडणवीसांवर आणि गिरीश महाजनांवर टीका करण्यात येत आहे. मात्र, आम्ही कुठल्याही ट्रोलिंगला घाबरत नाहीत. कारण, तुम्ही दाखवतात की सत्ता नसली तरी आम्हा फरक पडला नाही, तुम्ही मजबूत आहात, म्हणून आम्ही घाबरत नाहीत, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना ठणकावलं. 

बाळासाहेब सानप यांचा राजकीय प्रवास

सानप हे खरे तर मूळ काँग्रेस पक्षाचे ! पण भाजपात त्यांचे नशीब फळफळले आणि थेट महापौर झाले. त्यानंतर पक्षाला अधिक ‘अच्छे दिन’ आल्यानंतर थेट आमदार झाले. गेल्या पंचवार्षिक कारकिर्दीत तर मंत्रिपदाच्या स्पर्धेत कायम राहिले. अर्थातच, ते तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अत्यंत निकटवर्तीय असल्याने त्यांच्या शब्दाला इतके वजन वाढले की, संघटनात्मक शिस्तीमध्येदेखील संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी अनेकदा तडजोडी करून त्यांना सोयीची वाटतील असे निर्णय घेतले. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शहराध्यक्ष म्हणून उमेदवारी वाटप पूर्णत: त्यांच्या हाती होते. त्यानंतर महापालिकाच पूर्णत: त्यांच्या अधिपत्याखाली होती. मात्र, अशी सर्व अनुकूल स्थिती असतानाही त्यांच्याविषयी पक्षात रोष वाढत गेला आणि त्यांनी नंतर तर थेट तत्कालीन पालकमंत्री आणि तत्कालीन भाजप सरकारचे संकट मोचक गिरीश महाजन यांच्याशी वैमनस्य पत्करून संकट ओढवून घेतले. त्याची परिणीती त्यांची उमेदवारी कापण्यात झाली आणि त्यामुळेच बाळासाहेब सानप यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी करावी लागली. त्यातही अपयश आल्यानंतर त्यावेळी शिवसेनेने त्यांना चुचकारले आणि थेट शिवसेनेत ते दाखल झाले.
 

 

Web Title: We are not afraid of trolling, Chandrakant Patil slammed the opposition in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.