हम लोग मुहब्बत वाले हैं...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 01:01 AM2019-07-23T01:01:08+5:302019-07-23T01:01:24+5:30
तुम अपने अकीदो के नेजे हर दिल में उतारे जाते हो, हम लोग मुहब्बत वाले हैं, खंजर क्यों लहराते हों..., तहजीबो के लाखो फल आ जायेंगे, उर्दू का एक दरख्त लगा दो बस्ती में..., मुख्तसर दे दें, मोतेबर दे दें, इस तरह का हुनर दे दें..., अशा एकापेक्षा एक सरस उर्दू शेरोशायरीने ‘हमसफर’मध्ये उर्दू अदबची मैफल (मुशायरा) उत्तरोत्तर रंगली.
नाशिक : तुम अपने अकीदो के नेजे हर दिल में उतारे जाते हो, हम लोग मुहब्बत वाले हैं, खंजर क्यों लहराते हों..., तहजीबो के लाखो फल आ जायेंगे, उर्दू का एक दरख्त लगा दो बस्ती में..., मुख्तसर दे दें, मोतेबर दे दें, इस तरह का हुनर दे दें..., अशा एकापेक्षा एक सरस उर्दू शेरोशायरीने ‘हमसफर’मध्ये उर्दू अदबची मैफल (मुशायरा) उत्तरोत्तर रंगली.
निमित्त होते, नंदकिशोर भुतडा फाउंडेशनच्या वतीने गंगापूररोडवरील ‘हमसफर’मध्ये आयोजित ‘सहिफा-ए-मुहब्बत’ या उर्दू पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे. रविवारी (दि.२१) या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यानिमित्ताने जिल्ह्यातील मालेगाव, धुळे, जळगाव, भुसावळ, बुरहानपूर, मुंबई, पुणे आदी शहरांमधून उर्दू शायर उपस्थित होते. मंचावर अध्यक्षस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अधीक्षक सुनील कडासने, तर प्रमुख पाहुणे म्हणून लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल, पार्वतीबाई भुतडा, शकील हसरत, डॉ. इकबाल बर्की आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कडासने यांनी ज्येष्ठ शायर इकबाल अशर यांनी लिहिलेली ‘उर्दूू हैं मेरा नाम, मैं खुसरौ की पहेली, मैं मीर की हमराज, गालीब की सहेली...’ ही गझल सादर करून उर्दू भाषेचा प्रवास अधोरेखित केला.
तसेच त्यांनी हम लोग मुहब्बत वाले हैं..., ही गझल सादर करून उपस्थितांची दिलखुलास दाद मिळविली. यावेळी कवी राम पाठक, ज्येष्ठ उर्दू शायर आदम मुल्ला, जावेद अन्सारी, जिया बागपती, शकील हसरत, प्रास्ताविक अॅड. नंदकिशोर भुतडा यांनी केले. सूत्रसंचालन हारून उस्मानी यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत व परिचय सानवी भुतडा हिने केले व आभार शौनक भुतडा याने मानले.
गझलांनी असा रंगला मुशायरा
ज्येष्ठ शायर नासिर शकेब यांनी देख लीया ना लोगो तुमने मैने उजाले मांगे थे, रौशन हो गयी सारी बस्ती लेकिन हो गया अंधा मैं..., यकीन किजीये वो लोग अब भी मेरी नजर में बुरे नहीं हैं, जिन्होने चुन-चुन के लफ्ज फेके हैं जिंदगीभर खराब मुझपर..., खान अफसर यांनी किसे मै अपना बनाता, विसाल से पहले..., तर जुबेर अली ताबीश यांनी मैं क्या बताऊं वो कितने करीब हैं मेरे, मेरा खयाल बी उसको सुनाई देता हैं..., नदीम मिर्झा यांची इस तरह का हुनर दे दे... ही रचना दिलखुलास दाद घेऊन गेली. अहद अमजद यांनी खोलकर जो बैंठे हैं, गीबतो के दरवाजे..., मैं इधर आउंगा और आके उधर जाऊंगा, हाय ये दश्ते तमन्ना, यहीं मर जाऊंगा... या गझला सादर करून मुशायरा रंगतदार केला.