‘आम्हा गावाचं धन, वामनदादाचं गाणं’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:31 AM2021-09-02T04:31:47+5:302021-09-02T04:31:47+5:30
देशवंडी येथे आयोजित सामाजिक प्रबोधन गीतगायन व सादरीकरण कार्यशाळेत बोलताना व्यक्त केले. राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक यांचा जन्मशताब्दी ...
देशवंडी येथे आयोजित सामाजिक प्रबोधन गीतगायन व सादरीकरण कार्यशाळेत बोलताना व्यक्त केले. राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक यांचा जन्मशताब्दी संविधान शाहिरी वर्षानिमित्त लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान, जन्मशताब्दी महोत्सव समिती व देशवंडी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने देशवंडी गावातील शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या युवक-युवतींसाठी वामनदादा कर्डकांच्या गीतांचा परिचय, अभ्यास व रसग्रहण होण्याच्या दृष्टीने युवापिढीसोबत वामनदादांच्या गीतांची कार्यशाळा ‘आम्हा गांवाचं धन, वामनदादाचं गाणं’ हा उपक्रम राबविण्यात आला. लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक महाराष्ट्र संस्थेचे संस्थापक, कार्याध्यक्ष शरद शेजवळ यांच्या संकल्पनेतून घेण्यात आला. गायक जयपाल धीवर, कवी गुणवंत वाघ, रतन गायकवाड, गायिका आशा गायकवाड यांनी गीते सादर केली. वाद्य साथसंगत कुलदीप गोराडे, नीलेश तेलोरे (ढोलक) दिली. उदघाटन सतीश कापडी यांनी केले. सूत्रसंचालन प्रवीण कर्डक यांनी केले. तर देवीदास कर्डक यांनी आभार मानले. लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक, जन्मशताब्दी महोत्सव समिती देशवंडी, ग्रामस्थ सुभाष कर्डक, सतीश कापडी, साहिल सोनवणे, मनोहर कर्डक, संदीप कर्डक, महेंद्र गांगुर्डे, लता सोनवणे, वैशाली कर्डक, सोनल कर्डक, संजय कर्डक, जनार्दन कर्डक, रोशन कर्डक, सचिन कर्डक, उषा कर्डक आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो- ०१ देशवंडी
‘आम्हा गावाचं धन, वामनदादाचं गाणं’ या उपक्रमाच्या उदघाटनप्रसंगी शरद शेजवळ, प्रवीण कर्डक, देवीदास कर्डक, सतीश कापडी, जयपाल धीवर, गुणवंत वाघ, रतन गायकवाड आदी.
010921\01nsk_47_01092021_13.jpg
फोटो- ०१ देशवंडी