लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी...

By admin | Published: February 27, 2016 10:29 PM2016-02-27T22:29:50+5:302016-02-28T00:03:32+5:30

दिंडोरी, लासलगाव : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रम

We get fortune Marathi ... | लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी...

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी...

Next

दिंडोरी : तालुक्यातील राजारामनगर येथील बी. के. कावळे विद्यालयात कुसुमाग्रज जन्मदिन जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात आला. मराठी भाषेला वैभवशाली व समृद्ध अशी मोठी परंपरा आहे. भाषा हे संवादाचे साधन आणि अभिव्यक्तीचे माध्यम आहे, असे मत प्रसिद्ध साहित्यिक कवी लक्ष्मण महाडिक यांनी यावेळी व्यक्त केले.
कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य लक्ष्मण महाडिक यांच्या हस्ते करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या साहित्यसंपदेबाबत विद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख श्रीमती. व्ही. आर. जाधव यांनी मार्गदर्शन केले.
श्रीमती जे. एन. उफाडे यांनी ‘कुसुमाग्रज एक सर्व स्पर्शी साहित्यिक’ याविषयावर मार्गदर्शन केले.
विद्यार्थी नूतन वाघचौरे, पूजा कावळे, समीर जाधव, योगीता मातेरे, शुभांगी साबळे, महेश सोनवणे, कविता दुशिंग, कोमल आहेर, पूजा जाधव, दीपाली कावळे, अक्षदा गांगुर्डे, कांचन पवार, आनंदा यांनी कुसुमाग्रजांच्या कणा, मराठी माती, माझ्या मातीचे गाणे, गर्जा जय जय कार, आधार, जालियनवाला बाग अजूनही आशा संस्कृती काही बोलायाचे आहे. वेडात मराठे वीर दौडले सात, गवताचे पाते, या कविता सादर केल्या.
सूत्रसंचालन व आभार पी.एस. पाटील यांनी मानले. कार्यक्रमास पर्यवेक्षक रत्नाकर रोटे, प्रा. रघुवीर पाटसकर, नानासाहेब बोरसे, बाळासाहेब वडजे, निर्मला जाधव, देवीदास देसले, विलास शिंदे आदिंसह शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लासलगाव : येथील सरस्वती विद्यामंदिर शाळेत मराठी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक भीमराव शिंदे होते. त्यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी नवनाथ जिरे यांनी विद्यार्थ्यांना मराठी दिवसाची पार्श्वभूमी, कवी कुसुमाग्रज यांच्या कवितासंग्रहाविषयी, साहित्याविषयी माहिती दिली. विद्यार्थी तेजस जगताप, कावेरी मोरे, रोशन संचेती, वैदेही भावसार, उत्कर्षा कोल्हे, तन्वी लोणारी, अरमान पठान, नारायणी ठाकरे, रोहिणी उशीर, किशोर बनसोडे, मधुरा खालकर, श्रेया माठा, अनिरुद्ध जाधव, प्रणव भोर, सिद्धेश कुटे, हर्ष वाघ यांनी स्वरचित कवितांचे गायन व समूहगीत सादर केले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ जिरे यांनी केले. (लोकमत चमू)

Web Title: We get fortune Marathi ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.