रोजगाराची संधी आम्ही देऊ सोनं तुम्ही करा-मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:58 PM2018-09-29T12:58:21+5:302018-09-29T12:58:45+5:30
ओझर-आजच्या युगात शिक्षणापेक्षा कौशल्य महत्त्वाचे असून कौशल्य समोर आणण्याचे आमचे प्रयत्न आहेत. त्यासाठी संधी आम्ही देऊ त्याचे सोने तुम्ही करा. आज राज्यात उद्योग मोठ्या प्रमाणात येत असताना त्यांना हवे तसे रोजगार आम्ही बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उपलब्ध करत आहोत.
ओझर-आजच्या युगात शिक्षणापेक्षा कौशल्य महत्त्वाचे असून कौशल्य समोर आणण्याचे आमचे प्रयत्न आहेत. त्यासाठी संधी आम्ही देऊ त्याचे सोने तुम्ही करा. आज राज्यात उद्योग मोठ्या प्रमाणात येत असताना त्यांना हवे तसे रोजगार आम्ही बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उपलब्ध करत आहोत.आमदार अनिल कदम यांच्या प्रयत्नाने झालेल्या महारोजगार मेळाव्याला सुमारे बारा हजार युवक यवतींना संबोधित करताना ते बोलत होते.सुरवातीला दीपप्रज्वलन झाल्यानंतर प्रास्ताविक औद्योगिक विकास महामंडळाचे सचिव हर्षदीप कांबळे यांनी केले तर कदम यांनी रूपरेषा व सदर मेळावा भरवण्यामागचे उद्दिष्ठय नमूद केले. यावेळी फडणवीस म्हणाले, जसे मुंबई पुणे हा कॉरिडॉर एक झाला तसाच नाशिक मुंबई हा देखील सर्वच दृष्टीने एक होणार असून त्यासाठी समृद्धी महामार्ग रोजगार व औद्योगिक दृष्ट्या कसा वरदान ठरणार असून इंडस्ट्रियल ट्रँगलमध्ये नाशिक हा महत्वाचा टप्पा असल्याचे सांगितले.ड्रायपोर्ट झाल्यानंतर हजारो बेरोजगारांना संधी उपलब्ध होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री सुभाष देसाई, खासदार हरिश्चंद्र चव्हाण आमदार डॉ.राहुल अहेर, देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी बी.राधाकृष्णन, पोलीस महासंचालक छेरिंग दोरजे, अधीक्षक संजय दराडे, महाराष्ट्र चेंबर कमिटीचे अध्यक्ष आशिष नहार, जिल्हापरिषद अध्यक्ष शीतल सांगळे, कामगार संघटनेचे सरचिटणीस सचिन ढोमसे यासह शासनाच्या विविध खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.