बॉम्बस्फोटातील आरोपीशी आपला संबंध नाही - सुधाकर बडगुजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 17:22 IST2023-12-15T17:20:39+5:302023-12-15T17:22:54+5:30
हिवाळी अधिवेशनात भाजप आ. नितेश राणे, दादा भुसे यांनी यासंदर्भात केलेल्या आरोपांवरुन तसेच व्हायरल होत असलेल्या फोटोंवर भूमिका मांडण्यासाठी आयोजीत केलेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.

बॉम्बस्फोटातील आरोपीशी आपला संबंध नाही - सुधाकर बडगुजर
- संकेत शुक्ल
नाशिक : १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासमवेत व्हायरल झालेला फोटो अथवा व्हिडिओ फेक आहे. हा प्रकार माॅर्फिंगचा असून त्या गुन्हेगाराशी आपला कोणताही संबंध नसल्याची स्पष्टोक्ती शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली.
हिवाळी अधिवेशनात भाजप आ. नितेश राणे, दादा भुसे यांनी यासंदर्भात केलेल्या आरोपांवरुन तसेच व्हायरल होत असलेल्या फोटोंवर भूमिका मांडण्यासाठी आयोजीत केलेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख विजय करंजकर, दत्ता गायकवाड, सुनील बागुल, देवानंद बिरारी आदि उपस्थित होते.
पालकमंत्री दादा भुसे दुसऱ्यावर आरोप करतात. मात्र ललित पाटील प्रकरणात त्यांचा संबंध जगजाहीर आहे. त्यांच्यावरच देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत सिंचन विभागात काम करीत असताना भुसे यांना निलंबीत का करण्यात आले अशी विचारणाही बडगुजर यांनी केली.