आम्ही घेतले नाहीत, तेवढेच उरले पवार यांच्या पक्षात !देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 02:15 AM2019-10-18T02:15:47+5:302019-10-18T02:16:19+5:30

महाराष्टÑातील निवडणूक नेहमीपेक्षा वेगळी असून, महायुतीच्या समोर लढण्यासाठी कॉँग्रेस शिल्लक राहिलेली नाही, तर शरद पवार यांच्या राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये कोणी राहण्यासाठी तयार नाही. सध्या पवार यांच्यासोबत जे पक्षात राहिले आहेत, तेदेखील आमच्या संपर्कात होते, आमच्याकडे जागा नव्हती व खुर्च्या रिकाम्या नसल्यामुळे आम्हीच त्यांना पक्षात घेतले नाही, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

We have not taken so much in favor of Pawar! Devendra Fadnavis | आम्ही घेतले नाहीत, तेवढेच उरले पवार यांच्या पक्षात !देवेंद्र फडणवीस

आम्ही घेतले नाहीत, तेवढेच उरले पवार यांच्या पक्षात !देवेंद्र फडणवीस

Next
ठळक मुद्दे गोदाघाटावरील जाहीरसभेत गौप्यस्फोट

नाशिक : महाराष्टÑातील निवडणूक नेहमीपेक्षा वेगळी असून, महायुतीच्या समोर लढण्यासाठी कॉँग्रेस शिल्लक राहिलेली नाही, तर शरद पवार यांच्या राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये कोणी राहण्यासाठी तयार नाही. सध्या पवार यांच्यासोबत जे पक्षात राहिले आहेत, तेदेखील आमच्या संपर्कात होते, आमच्याकडे जागा नव्हती व खुर्च्या रिकाम्या नसल्यामुळे आम्हीच त्यांना पक्षात घेतले नाही, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. पवार यांचे तेल लावलेले पैलवान एकमेकांच्या विरोधात लढले व त्यांना सोडून गेले त्यामुळे त्यांच्याकडे आता काहीच शिल्लक राहिलेले नाही, असा दावाही फडणवीस यांनी केला.
गोदाघाटावर युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित महाजनादेश संकल्प सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ते पुढे म्हणाले, यापूर्वीच्या निवडणुकीत
कोणाचे सरकार सत्तेवर येणार, कोणाच्या किती जागा निवडून येणार याची चर्चा व्हायची. यंदाची निवडणुकीत मात्र विरोधीपक्षच शिल्लक राहिलेला नाही. कॉँग्रेसचे राहुल गांधी हे निवडणुकीच्या तोंडावर बॅँकॉकला गेले, तेथून परतल्यावर त्यांनी मुंबईत सभा घेतली त्यात त्यांनी ७० वर्षांपासून जनतेवर अन्याय होत असल्याचे सांगितले व एक प्रकारे भाजपचाच प्रचार करून गेले. त्यामुळे गेल्या वेळी ४२ जागा निवडून आलेल्या कॉँग्रेसच्या यंदा २१ जागा तरी येतात की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षात कोणी राहण्यास तयार नाही. जे आहेत ते आमच्या संपर्कात होते, पक्षात घ्या म्हणून आग्रह करीत होते. मात्र आमच्याकडे जागा नसल्यामुळेच ते पवार यांच्याकडे थांबले आहेत. असे सांगून, पवार स्वत:ला कुस्तिगीर परिषदेचे अध्यक्ष म्हणवून घेत असले व त्यांच्याकडे तेल लावलेले पैलवान असले तरी, हे सारे पैलवान एकमेकांच्या विरोधात लढले व पवार यांना सोडून गेले, त्यामुळे पवार यांची अवस्था शोलेतील जेलर सारखी झाल्याची टीका फडणवीस यांनी केली.
गेल्या पाच वर्षांत आपल्या सरकारने आघाडी सरकारच्या पंधरा वर्षांपेक्षा अधिक कामे केली असून, हिम्मत असेल तर आघाडीने आपल्या पंधरा वर्षांतील कामाचा हिशेब द्यावा, आपण पाच वर्षांच्या कामाचा हिशेब देऊ, असे आव्हानही त्यांनी दिले.
यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर रंजना भानसी, माजी संघटनमंत्री डॉ. रघुनाथ कुलकर्णी, विजय साने, सुनील बागुल, वसंत गिते, प्रकाश लोंढे, गिरीश पालवे, पक्षाचे उमेदवार आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले आदी उपस्थित होते.
...तर तुम्हाला ‘भ्रष्टाचार रत्न’ पुरस्कार मिळू शकतो
आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, अशी भूमिका भाजपने घेतल्याने त्याला कॉँग्रेसच्या पक्ष प्रवक्त्याने विरोध केल्याचे सांगितले. सावरकर यांनी देशासाठी दिलेले बलिदान पाहता, ते भारतरत्न पुरस्कारासाठी पात्रच आहेत, परंतु कॉँग्रेसला जर एखादा पुरस्कार द्यायचाच ठरला तर भ्रष्टाचार रत्नच पुरस्कार मिळू शकतो, अशी टीका करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत सावरकर यांच्याविषयी कॉँग्रेसला आदर असल्याचे सांगितले, जर कॉँग्रेसला सावरकरांविषयी आदरच होता तर मग निवडणुकीच्या तोंडावर कॉँग्रेसला आता सावरकरांचा पुळका आल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

भुजबळांना फुले यांचा भारतरत्न मान्य नाही कास्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याप्रमाणेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यात यावा, अशी भाजपची भूमिका असून, महात्मा फुले यांना ‘भारतरत्न’ देण्यावर छगन भुजबळ यांनी ‘भारतरत्ना’पेक्षा ‘महात्मा’ पदवी मोठी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. जर भुजबळ यांना ‘महात्मा’ ही पदवी मोठी वाटत असेल तर फुले यांना देण्याची शिफारस केलेला ‘भारतरत्न’ पुरस्कार मान्य नाही का? असा सवाल फडणवीस यांनी केला.

 

 

Web Title: We have not taken so much in favor of Pawar! Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.