उच्च ध्येयपूर्तीसाठी दक्ष राहणे आवश्यक : पोलीस निरीक्षक गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:15 AM2021-03-08T04:15:42+5:302021-03-08T04:15:42+5:30
येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महिला स्वसंरक्षण व समुपदेशन या विद्यार्थिनींसाठी आयोजित कार्यक्रमात गायकवाड बोलत होते. ते पुढे ...
येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महिला स्वसंरक्षण व समुपदेशन या विद्यार्थिनींसाठी आयोजित कार्यक्रमात गायकवाड बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मोबाइल हा चांगला वापरल्यास तो आपल्याला विशिष्ट उंचीवर पोहोचवतो, मात्र त्याचा गैरवापर झाल्यास आपले जीवनदेखील उद्ध्वस्त करू शकतो. कीर्ती जाधव यांनी ज्या मातेने समाज संरक्षणासाठी शिवबांना घडवले. ज्या मातेने स्त्री शिक्षणासाठी आपले समग्र जीवन अर्पण केले त्या सावित्रीबाई, त्याचप्रमाणे आपल्या तान्हुल्या यासाठी गड उतरणारी हिरकणी, तसेच झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर आदी महिलांचा आदर्श ठेवून मुलींनी कर्तव्यदक्ष राहावे. ध्येय निश्चित करून त्यासाठी जीवनात पराकाष्टा करावी असे स्पष्ट केले. राज्य मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप धोंडगे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस.पी. कांबळे, प्रा. एम. पाटील, प्रा. एल.पी. गवळी, प्रा. ए.एम. पटेल, प्रा.श्रीमती ए.सी. चौधरी, प्रा. एस. एस. पवार, प्रा. एन.डी. सोनवणे व महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक विकास पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन पी.आर. पवार यांनी केले.