‘आम्ही साऱ्या जणी’ संस्थेचा उपक्रम

By admin | Published: October 1, 2016 01:16 AM2016-10-01T01:16:14+5:302016-10-01T01:16:47+5:30

पथनाट्य सादरीकरण : शिक्षण विषयावरही व्याख्यान

We take initiative of 'Sarai Jani' organization | ‘आम्ही साऱ्या जणी’ संस्थेचा उपक्रम

‘आम्ही साऱ्या जणी’ संस्थेचा उपक्रम

Next

नाशिक : ‘आम्ही साऱ्या जणी’ या सामाजिक संघटनेच्या वतीने महिलांसाठी विविध विषयांवरील प्रात्याक्षिक आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पथनाट्य सादरीकरणाचा बहारदार कार्यक्रम झाला.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष प्रभा कुलकर्णी, माजी आमदार निशिगंधा मोगल, हिरा कुलकर्णी, सुनीता तारापुरे उपस्थित होते. याप्रसंगी आमदार हिरे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री दुर्गा महिला संस्थेच्यावतीने ‘शिक्षण’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. पुष्पा गोटखिंडीकर लिखित ‘पथनाट्य सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांवर लादण्यात आलेले दफ्तराचे ओझे, व आजची शिक्षण पद्धती यावर परखड विचार मांडण्यात आले. मृणालिनी साळवेकर, जयश्री रत्नापारखी, माणिक तांबे, वैदेही गायधनी, वासंती बेंद्रे यांनी चर्चेत भाग घेतला. मुलींची घटणारी संख्या, रुढी, परंपरा या विषयावर ‘बेटी बचाव’ नावाचे पथनाट्य सादर करण्यात आले. माताबालक प्रतिष्ठान यांच्यावतीने पथनाट्य सादर झाले. विनीता परांजपे लिखिीा पथनाट्यात निशिगंधा मोगल, मनीषा केळकर, निक, म्हैसकर, दिंडोरकर आदिंनी भाग घेतला. वनिता विकास मंडळातर्फे संस्कार या विषावर रेवती पारीख लिखीत पथनाट्य सादर केले. यात मंगला कुलकर्णी, शुभदा बेर्डे, बुरकुले, देशपांडे आदिंनी भाग घेतला.
सुनीता तारापुरे यांनीही पथनाट्य सादर केले. प्राची गद्रे हिने पथनाट्याचे संगीत संयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृंदा लवटे यांनी केले, तर रेवती पारेख यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: We take initiative of 'Sarai Jani' organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.