तिसऱ्या लाटेतही आपण कोरोनाला हरवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:11 AM2021-06-22T04:11:22+5:302021-06-22T04:11:22+5:30
पळसे येथे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विलगीकरण कक्ष स्थापन करून रुग्णांना मोफत उपचाराची सुविधा, मोफत तपासणी, समुपदेशन केंद्र आदी सुविधा ...
पळसे येथे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विलगीकरण कक्ष स्थापन करून रुग्णांना मोफत उपचाराची सुविधा, मोफत तपासणी, समुपदेशन केंद्र आदी सुविधा ग्रामपालिकेने दिल्या होत्या. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कार्यकर्ती, शिक्षक यांनी सामूहिकपणे सातत्याने गावात सर्व्हे करून संशयित रुग्णांचा शोध घेतला. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यात पळसे गावाला यश आले. त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष विष्णुपंत गायखे, व्हीजी फाउंडेशनचे अध्यक्ष नवनाथ गायधनी, सरपंच सुरेखा गायधनी, उपसरपंच दिलीप गायधनी, डॉ. भास्कर गुप्ता, डॉ. ऋषिकेश कोठावदे, डॉ. प्रशांत लुंकड, डॉ. योगेश जाधव, डॉ. गणेश काळुंगे, पोलीस पाटील सुनील गायधनी, राजाराम गायधनी, भाऊसाहेब गायधनी, किरण चंद्रमोरे, प्रिया गायधनी, समाधान गायखे, कमल गायधनी, मधुकर पगार, मुख्याध्यापक तानाजी गाडे, संजय बोरसे, मधुकर संधान, आशीर्वाद गायखे, रविकांत टावरे, माधवराव गायधनी, संतोष गायधनी, समाधान गायधनी, दुर्गादास चारसकर, भारत गायधनी, गणेश आगळे, गोकुळ ढेरिंगे, सुनंदा गायधनी, उषा तुपे, कल्याणी शिंदे, अलका सरसंभे, आरती गायखे, वैशाली पगार, वैशाली थेटे, अनिता शिंदे, मनीषा शिंदे, अर्चना रत्नपारखी, लता चिडे, उषा उगले, रेखा गायधनी, शीला गायधनी, भारती गायधनी, मोनिका गायधनी, रोहिणी ढेरिंगे, पूनम बोडके, मीना मते आदी उपस्थित होते.
अवयवदान करणारे जोडपे माधुरी व समाधान गायधनी यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. (फोटो २१ पळसे)