समाजाच्या उत्कर्षासाठी झटत राहू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:31 AM2021-09-02T04:31:25+5:302021-09-02T04:31:25+5:30
मालेगाव : केंद्र शासनाच्या ज्या काही योजना असतील त्या आपण तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवू. देशसेवा व समाजसेवा हे आपले ...
मालेगाव : केंद्र शासनाच्या ज्या काही योजना असतील त्या आपण तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवू. देशसेवा व समाजसेवा हे आपले ब्रीद असून समाजाला बरोबर घेऊनच आपण कार्य करीत राहू. समाजाच्या उत्कर्षासाठी झटत राहू, असे प्रतिपादन केंद्रीय माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले. येथील गवळी युवा शैक्षणिक , सामाजिक संस्था व भारतीय जनता पार्टी मालेगाव शहर यांनी आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थी व समाज बांधवांच्या गुणगौरव सोहळ्यात अहिर बोलत होते. दिलेला शब्द पाळणारा गवळी समाज आहे. ते प्रामाणिकपणे पाठीशी राहून साथ देत असतात. अशा समाजातील गुणवंतांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन द्यायलाच हवे, असे बाजार समितीचे संचालक बंडूकाका बच्छाव यांनी सांगितले. भाजपचे गटनेते सुनील गायकवाड यांनी गवळी समाजाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. समाजातील नेतृत्वाने पुढे आले पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली. शहराची दिशा व दशा काय झाली आहे हे आपण सर्व जण पाहात आहोत. त्यामुळे अहिर यांनी केंद्राकडून शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. यावेळी धुळेचे प्रभारी महापौर भगवान गवळी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष हिरामण गवळी, महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे उपाध्यक्ष वसंत गवळी, उत्तर महाराष्ट्र व्यापारी आघाडीचे नितीन पोफळे, दादा जाधव, विवेक वारूळे, जयप्रकाश पठाडे, सोमा गवळी, संभाजी घुले, आण्णा चिपडे, सुपा पिरनाईक, अभिषेक भावसार, दीपक शिंदे, दिनेश सांबणे, राजेंद्र शेलार, विजय एैथाल, विलास सटवाजी गवळी, अध्यक्ष सुनील मारोती उदिकर, संतोष घुले, कचरू उदिकर, भीमा गवळी, उमेश नामागवळी आदी उपस्थित होते