कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:11 AM2021-07-16T04:11:50+5:302021-07-16T04:11:50+5:30
येथील पोलीस नियंत्रण कक्ष आवारातील सुसंवाद सभागृहात झालेल्या शांतता व एकात्मता समितीच्या बैठकीत जिल्हा पोलीसप्रमुख पाटील बोलत होते. व्यासपीठावर ...
येथील पोलीस नियंत्रण कक्ष आवारातील सुसंवाद सभागृहात झालेल्या शांतता व एकात्मता समितीच्या बैठकीत जिल्हा पोलीसप्रमुख पाटील बोलत होते. व्यासपीठावर अपर पाेलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, प्रांत अधिकारी विजयानंद शर्मा, उपअधीक्षक लता दोंदे, शशिकांत शिंदे, उपायुक्त राहुल आहेर, राजू खैरनार, आदी उपस्थित होतेे. यावेळी पाटील म्हणाले की, गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही बकरी ईदवर कोरोनाचे सावट आहे. शासनाने निर्देशित केलेल्या नियमांनुसारच बकरी ईद सण साजरा करावा. महापालिकेने पाणीपुरवठा सुरळीत करावा. वीज वितरण कंपनीने वीज पुरवठ्याबाबत काळजी घ्यावी. उघड्यावर कत्तल करू नये. अप्रिय घटना घडल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे. सण व उत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन पाटील यांनी केले. प्रांत अधिकारी शर्मा यांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करीत बकरी ईद सण साजरी करण्याचे आवाहन केले. यावेळी रियाज अन्सारी, डॉ. अतहर अशरफी, रामा मिस्तरी, हरिप्रसाद गुप्ता, ॲड. हिदायतुल्ला, मौलाना हमीद अजहरी, आदींची भाषणे झाली.
---------------
प्रतिबंधात्मक औषध फवारणी
महापालिकेचे उपायुक्त राजू खैरनार यांनी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. प्रभागनिहाय पथके तैनात करण्यात आली आहेत. निरुपयोगी मांसची शहराबाहेरील कचरा डेपोवर विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक वॉर्डात स्वच्छता निरीक्षक नेमण्यात आले आहे. दोन टिप्पर व १० ट्रॅक्टर व वॉटरग्रेस कंपनीच्या वाहनांचा उपयोग केला जाणार आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कचरा डेपोवर दुर्गंधी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक औषध फवारणी केली जाणार आहे. पशुसंवर्धन विभागाचे नरवडे यांनी बकरी ईदसाठी १९ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली असल्याचे सांगितले.
फोटो फाईल नेम : १५ एमजेयुएल ०१ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगावी पोलीस नियंत्रण कक्ष आवारात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत बोलताना ग्रामीण जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील. समवेत अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, प्रांत अधिकारी विजयानंद शर्मा, उपअधीक्षक लता दोंदे, शशिकांत शिंदे, उपायुक्त राहुल अहिरे, राजू खैरनार, आदी उपस्थित होते.
150721\15nsk_20_15072021_13.jpg
फाेटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.