नाशकात घाऊक किराणा व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:49 AM2018-09-29T00:49:29+5:302018-09-29T00:50:14+5:30
भारत व्यापार बंदला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमधील छोट्या-मोठ्या व्यापाºयांनी उत्स्फूर्त सहभाग घेत शहरात शुक्रवारी (दि. २८) व्यापार बंद आंदोलन केले. या आंदोलनात घाऊक किराणा व्यापाºयांनी कडकडीत बंद पाळल्याने बाजारपेठेतील जवळपास २४ ते २५ कोटींची उलाढाल ठप्प झाली.
नाशिक : भारत व्यापार बंदला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमधील छोट्या-मोठ्या व्यापाºयांनी उत्स्फूर्त सहभाग घेत शहरात शुक्रवारी (दि. २८) व्यापार बंद आंदोलन केले. या आंदोलनात घाऊक किराणा व्यापाºयांनी कडकडीत बंद पाळल्याने बाजारपेठेतील जवळपास २४ ते २५ कोटींची उलाढाल ठप्प झाली. मात्र, मेनरोड, एमजीरोड परिसरातील कटलरी, इलेक्ट्रॉनिक गॅझेट, पादत्राणे, कापड विक्रेत्यांनी मोर्चानंतर दुकाने उघडली. त्यामुळे किराणा व्यावसाय वगळता शहरातील व्यापाºयांना भारत बंदमध्ये संमिश्र सहभाग नोंदविल्याचे दिसून आले देशाच्या आर्थिक विकासात मोठे योगदान देणाºया तसेच लाखोंची रोजगारनिर्मिती करणारे किरकोळ व्यापारी, विक्रेत्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असताना वॉलमार्ट आणि फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांच्या किरकोळ व्यापारातील गुंतवणुकीचा थेट फटका व्यापा-यांना बसणार आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातील थेट परकीय गुंतवणुकीसह रिटेल व होलसेल मॉलला विरोध करण्यासाठी नाशिकमधील व्यापाºयांनी शुक्रवारी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. व्यापाºयांनी सकाळी १० वाजता रविवार कारंजा येथे
एकत्र येत चांदीच्या गणपतीची आरती करून रविवार कारंजा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. या आंदोलनात महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सच्या नेतृत्वात नाशिक घाऊ क किराणा व्यापारी संघटना, किरकोळ किराणा व्यापारी संघटना, नाशिक मोटार मर्चंट संघटना, हार्डवेअर मर्चंट संघटना, प्लायवूड मर्चंट, नाशिक मोटार मर्चंटसह इतर व्यापारी संघटनांनी बंदमध्ये सहभाग घेतला होता.
२४ ते २५ कोटींची उलाढाल ठप्प
जिल्ह्यात किराणा आणि धान्याचे जवळपास अडीच हजार नोंदणीकृत व्यापारी आहेत. तर शहरात सुमारे पाचशे घाऊक व्यापारी आहेत. या सर्व व्यापाºयांसह सकाळच्या सुमारास बंदमुळे अन्य व्यावसायिकांनीही त्यांची दुकाने बंद ठेवल्याने शहरातील सुमारे २४ ते २५ कोटींची उलाढाल ठप्प झाली. इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचरसह इतर छोट्या-मोठ्या व्यापाºयांची अशी एकूण ५ ते ६ कोटी रु पयांची उलाढाल ठप्प झाली, तर घाऊक किराणा व्यवसायात सर्वाधिक १२ ते १३ कोटी रुपयांच्या उलाढालीला ब्रेक लागला. किरकोळ व्यवसायात ४ ते ५ कोटींची उलाढाल ठप्प झाली. दरम्यान, नाशिक सराफ संघटनेने या बंदला पाठिंबा देऊन आंदोलनकर्त्या व्यापाºयांची भेट घेऊन निषेध व्यक्त केला. मात्र, सराफी पेढ्यांचे व्यवहार नियमित सुरू होते. तर कापड विक्रेत्यांनी दुपारनंतर दुकाने सुरू केल्याचे दिसून आले.
जगभरात मॉल संस्कृतीमुळे किरकोळ व्यापार धोक्यात आल्याने मंदीचे सावट असताना भारतातही परकीय गुंतवणुकीच्या माध्यमातून किरकोळ आणि घाऊक व्यापारात मॉल संस्कृतीची सुरुवात होऊ लागली आहे. नाशिकमध्येही अशाप्रकारे मॉल संस्कृती वाढू लागल्यामुळे घाऊक व्यापाºयांसोबतच किरकोळ किक्रेत्यांच्या चिंतेत भर पडली असून, त्यांच्या व्यवसायावरही विपरित परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे धान्य, प्लायवूड तसेच विविध किरकोळ विक्रेत्यांनी शुक्रवारी देशभरात बंद पाळला. नाशिकमध्ये या बंदला किराणा व्यापाºयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.