आरोग्यसंपन्न विद्यार्थी राष्टÑाची संपत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 11:38 PM2020-01-11T23:38:09+5:302020-01-12T01:25:25+5:30
सिन्नर : निरोगी शरीर ही आपल्या स्वत:च्या संपत्तीसोबत ती राष्ट्रीय संपत्ती आहे. निरोगी राष्ट्र तेव्हाच बनू शकते जेव्हा राष्ट्रातील ...
सिन्नर : निरोगी शरीर ही आपल्या स्वत:च्या संपत्तीसोबत ती राष्ट्रीय संपत्ती आहे. निरोगी राष्ट्र तेव्हाच बनू शकते जेव्हा राष्ट्रातील विद्यार्थी निरोगी असतील, असे प्रतिपादन माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे सचिव राजेश गडाख यांनी केले.
माजी आमदार स्व. सूर्यभान तथा नानासाहेब गडाख यांच्या जयंतीनिमित्त एस. जी. पब्लिक स्कूल प्राथमिक व किड्स बालवाडी विभागात आयोजित विद्यार्थी आरोग्य तपासणी शिबिराप्रसंगी ते बोलत होते.
सूर्यभान गडाख हे आपल्या संपूर्ण आयुष्यात शारीरिक आरोग्याला खूप महत्त्व देत असत. दररोज योगा व सात किलोमीटर पायी चालत असत. त्यामुळे त्यांचा आदर्श आपण व विद्यार्थ्यांनी घ्यावा म्हणून जयंतीनिमित्त हा उपक्रम राबविण्यात आल्याचे राजेश गडाख यांनी सांगितले. व्यासपीठावर सुनीता गडाख, अण्णासाहेब गडाख, ताराचंदजी खिंवसरा, एसएमबीटी आयुर्वेद रुग्णालयाचे बालरोग विभागप्रमुख विजय सूर्यवंशी, सतीश उºहे, बालरोग विभागाचे जितेश ठाकूर, प्रियंका अल्टे, भागवत साबळे, उदय कुदळे, सोमनाथ थेटे उपस्थित होते. यावेळी सूर्यभान गडाख यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबीरास प्रारंभ करण्यात आला.
माध्यमिक लोकशिक्षण मंडळ व एसएमबीटी आयुर्वेद रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने बालवाडी ते इयत्ता चौथीतील १०५० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरासाठी एसएमबीटी आयुर्वेद रुग्णालयातील प्रियंका अल्टे, भागवत साबळे, नरेंद्र राका, नैना लुल्ला, डॉ. श्वेता कातकाडे, रोहीत चव्हाण, यशश्री कुलकर्णी, कल्पेश पाटील, दामिनी माळी यांनी तपासणी करून सल्ला दिला. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.