समृद्धीच्या पैशांवरून भाऊबंदकी! हरकतींचा पाऊस : भांडणे सोडवताना अधिकाºयांची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 01:59 AM2018-01-06T01:59:29+5:302018-01-06T02:00:06+5:30
नाशिक : बाजारभावापेक्षा पाच पट अधिक रकमेचा जमिनीचा मोबदला मिळत असल्याचे पाहून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जमीन देण्यास शेतकºयांमध्ये चढाओढ लागलेली असतानाच, जमिनीच्या मिळणाºया मोबदल्यावरून आता घराघरांत भांडणे सुरू झाली आहेत.
नाशिक : बाजारभावापेक्षा पाच पट अधिक रकमेचा जमिनीचा मोबदला मिळत असल्याचे पाहून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जमीन देण्यास शेतकºयांमध्ये चढाओढ लागलेली असतानाच, जमिनीच्या मिळणाºया मोबदल्यावरून आता घराघरांत भांडणे सुरू झाली आहेत. एकेकाळी पडिक म्हणून दुर्लक्ष केलेल्या जमिनीवर आपला मालकी हक्क सांगण्यात नातेसंबंधातील एकापेक्षा अधिक व्यक्ती ऐनवेळी समोर उभे ठाकत असल्याने त्यांच्यातील पैशांचे वाद पाहून अधिकाºयांना ‘ना बाप बडा, ना भैया, सबसे बडा रुपय्या’ या गाण्याची आठवण येऊ लागली आहे.
जिल्ह्णातील सिन्नर व इगतपुरी या दोन तालुक्यांतून समृद्धी महामार्ग जात असून, जवळपास १२०० हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. प्रशासनाने समृद्धी महामार्गासाठी जमिनीची मोजणी करून प्रत्येक गटधारकास नोटीस बजावून त्यांचे म्हणणे जाणून घेण्याबरोबरच जमिनीचे व तेथील मालमत्तेचे मूल्यांकन करून मिळणाºया मोबदल्याची रक्कमही जाहीर केली आहे. नेमकी हीच बाब घराघरांतील भाऊबंदकीसाठी डोकेदुखी ठरली असून, ज्या ज्या जागामालकांनी समृद्धीसाठी जमीन देण्यासाठी तयारी दर्शविली अशांच्या सातबारा उताºयावर नाव असलेल्या सर्वांचीच संमती आणण्याचे बंधनकारक करण्यात आल्यावर मिळणाºया मोबदल्याच्या वाट्याहिश्यावरून वाद सुरू झाले आहेत. पुणे, मुंबई यांसारख्या बाहेरगावी अनेक वर्षे नोकरीला असलेल्या व कधीही जमिनीकडे ढुंकूनही न पाहिलेल्या कुटुंबातील व्यक्तींनी आता संमती देण्यासाठी पैशांची मागणी सुरू केली आहे, तर लग्न होऊन सासरी गेलेल्या बहिणींनीदेखील वडिलोपार्जित जमिनीवर आता हक्क सांगण्यात सुरुवात केली आहे. गेली ३० ते ४० वर्षे निव्वळ तोंडी बोलीवर वाटणी झालेल्या जमिनीच्या मालकी हक्कावरूनही समृद्धीवरून पुन्हा वाटणी करण्यापर्यंत वाद पोहोचले आहेत. गट एकत्रिकरणात समजोत्यानुसार वाटून घेतलेल्या जमिनी इतक्या वर्षी कसल्यानंतर निव्वळ समृद्धीत संपादन होणार असल्याचे पाहून मूळ मालकांनी गट एकत्रिकरणाचा समझोताही नाकारला आहे. गावागावात व गटागटात जमिनीच्या मालकी हक्कावरून सुरू झालेल्या वादामुळे निफाड व इगतपुरी प्रांत अधिकाºयांकडे शेकडोच्या संख्येने जमीन मालकांच्या हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. त्यात भावाने भावाविरुद्ध, मुलाने वडिलांविरुद्ध, मुलीने भाऊ व वडिलांविरुद्ध, काकाने चुलत्याविरुद्ध, आईने मुलाविरुद्ध मोठ्या संख्येने हरकती दाखल करून जमिनीच्या संपादनात खोडा घातला आहे. त्यामुळे अशा हरकतींची सुनावणी घेताना समोर येणाºया बाबी पाहून अधिकारीही चकीत झाले आहेत.
निव्वळ दिवाळीत साडी घेतली नाही व मेहुण्याचा मानपान केला नाही म्हणून रुसून बसलेल्या बहिणीची समजूत काढताना अधिकाºयांच्याही नाकीनव आले असून, समृद्धीत जाणाºया जागेचा समान मोबदला मिळावा तसेच उर्वरित जमिनीची समान वाटणी करून द्यावी, अशी मागणी करणाºया कुटुंबात समझोता घडवून आणण्यासाठी समुपदेशन करण्याचेही काम करावे लागत आहे.
ना बाप बडा, ना बेटा....
मुंबईत बड्या पगारावर नोकरीस असलेल्या मुलाने अनेक वर्षे जमिनीकडे ढुंकूनही पाहिले नाही. आई-वडील लहान भावाकडे राहतात व तेथेच शेती करून गुजराण करणाºया कुटुंबातील मोठ्या मुलाने फार वर्षांपूर्वीच शेती नको म्हणून जाहीर केल्याने आता समृद्धीत पैसे मिळणार असल्याचे पाहून थेट आई, वडिलांच्या विरोधातच हरकत घेतली. जमिनीचे तीन हिस्से करून मिळणाºया मोबदल्याचा तिसरा हिस्सा मिळावा म्हणून आग्रह धरला. अखेर आई, वडील, मोठा मुलगा व लहान मुलगा असे चार हिस्से करण्यात आल्यावर मोठ्या मुलाला त्याच्या हिश्श्याची रक्कम द्यावी लागल्याची घटना इगतपुरी तालुक्यात घडल्याने ‘ना बाप बडा, ना बेटा, भय्या सबसे बडा रुपय्या’ याची प्रचिती अधिकाºयांना आली.