निवडणूकीच्या काळात २८५ लोकांचे शस्त्रे होणार जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 02:59 PM2019-09-25T14:59:25+5:302019-09-25T15:04:29+5:30

शहरात कोठेही कुठल्याहीप्रकारे कायदासुव्यवस्थेला धोका निर्माण होणार नाही, यासाठी पोलीस प्रशासनाक डून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहे.

Weapons of 6 people will be seized during election period | निवडणूकीच्या काळात २८५ लोकांचे शस्त्रे होणार जप्त

निवडणूकीच्या काळात २८५ लोकांचे शस्त्रे होणार जप्त

Next
ठळक मुद्देसराईत ९३ गुन्हेगार शहर-जिल्ह्यातून तडीपार सुरक्षेच्या दृष्टीने ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार

नाशिक : आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये तयार करण्यात आलेल्या समितीच्या निर्देशानुसार शहरातील सुमारे २८५ परवानाधारक शस्त्रे जप्त करण्यात येणार आहे. शहरात एकूण १ हजार २५० व्यक्तींकडे परवाना असलेली शस्त्रे असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.
निवडणूकीची आचारसंहिता लागू झालेली असून पोलीस प्रशासनाने लोकसभा निवडणूकीपासूनच विधानसभा निवडणूकीच्या बंदोबस्ताची तयारी केली आहे. शहरात कोठेही कुठल्याहीप्रकारे कायदासुव्यवस्थेला धोका निर्माण होणार नाही, यासाठी पोलीस प्रशासनाक डून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहे. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या यादीवरील सराईत गुन्हेगारांची चाचपणी केली जात आहे. आतापर्यंत उपद्रवी संशयित एक हजारांपेक्षा अधिक लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच सराईत गुन्हेगारांपैकी ९३ गुन्हेगारांना शहरास जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. ९ संशयितांवर झोपडपट्टी दादा कायद्यान्वये गुन्हे दाखल क रण्यात आले आहेत. विधानसभा निवडणूक नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपासून तर थेट निकालाच्या दिवसापर्यंतचा शहरातील सर्व मतदान केंद्रे, पाच स्ट्रॉँग रूम, संवेदनशील मतदान केंद्रे, प्रचारफेऱ्या, प्रचार सभा याबाबत चोख बंदोबस्त व सुरक्षेच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार असल्याचे नांगरे पाटील म्हणाले.
निवडणूक काळात कुठल्याहीप्रकारे अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून तुर्तास २८५ परवानाधारक व्यक्तींचे शस्त्रे जप्त करण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत, त्या निर्देशानुसार शस्त्रे जप्तीची कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. गरज वाटल्यास उर्वरित एक हजार लोकांमधूनदेखील शस्त्रे जप्त केली जाऊ शकतात. बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्यांविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Weapons of 6 people will be seized during election period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.