शस्त्रसाठा लूट प्रकरण : दाऊदचा शार्पशूटर सुका पाचासह तिघांना मोक्काअंतर्गत सात दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 05:56 PM2017-12-28T17:56:29+5:302017-12-28T18:19:54+5:30

चौदा दिवसांपुर्वी मध्यरात्री नाशिक ग्रामीण पोलिसांनी चांदवड टोलनाक्यावर शस्त्रसाठ्यासह अटक केलेल्या दाऊदचा शार्पशूटर बद्रीनुजमान अकबर बादशाह ऊर्फ सुमित सुका पाचा या संशयित आरोपीसह तीघांना नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयाने मोक्काअंतर्गत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Weapons loot case: Seven days police detention under mocca offence,accused | शस्त्रसाठा लूट प्रकरण : दाऊदचा शार्पशूटर सुका पाचासह तिघांना मोक्काअंतर्गत सात दिवसांची पोलीस कोठडी

शस्त्रसाठा लूट प्रकरण : दाऊदचा शार्पशूटर सुका पाचासह तिघांना मोक्काअंतर्गत सात दिवसांची पोलीस कोठडी

googlenewsNext
ठळक मुद्दे न्यायालयाने चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.न्यायालयाने मोक्कांतर्गत या चौघांना सात दिवसांची कोठडी सुनावली.शस्त्रसाठा लूटूत मुंबईच्या दिशेने वाहतुक करण्यामागे मोठा घातपातचा वाजवी संशय

नाशिक : चौदा दिवसांपुर्वी मध्यरात्री नाशिक ग्रामीण पोलिसांनी चांदवड टोलनाक्यावर शस्त्रसाठ्यासह अटक केलेल्या दाऊदचा शार्पशूटर बद्रीनुजमान अकबर बादशाह ऊर्फ सुमित सुका पाचा या संशयित आरोपीसह तीघांना नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयाने मोक्काअंतर्गत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
उत्तरप्रदेशमधील बांदा जिल्ह्याच्या रेल्वेस्थानकापासून काही मीटर अंतरावर असलेल्या पंजाब आर्म्स सेंटर हे शस्त्रांचे दुकान बादशाह ऊर्फ सुका व त्याच्या साथीदारांनी बुधवारी (दि.१३) मध्यरात्री लुटल्याची घटना घडली होती. नाशिक जिल्ह्यातील चांदवड पोलिसांनी नाकाबंदी करून शस्त्रांचा साठा असलेल्या जीपसह सुका पाचा व त्याच्या साथीदारांना गुरुवारी (दि.१४) रात्री महामार्गावर रंगेहाथ पकडले होते. यानंतर पोलिसांनी संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर या संशयितांना नाशिक ग्रामिण पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने विशेष मोक्का न्यायालयात हजर केले. या संशयितांवर २७ डिसेंबर रोजी मोक्का कायद्यान्वये तरतुदींचा अहवाल नाशिकच्या विशेष न्यायालयात दाखल करण्यात आला होता. मुंबईच्या शिवडीमध्ये राहणारा संशयित वाजीद शहा यास अजमेर येथून ताब्यात घेतले होते. या वाजिदसह तीघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने मोक्कांतर्गत या चौघांना सात दिवसांची कोठडी सुनावली.
बांदा, अंबोली, चांदवड, आरएके, मालेगाव पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहे.विशेष मोक्का इनचार्ज न्यायालय न्यायाधीश सुरेंद्रकुमार शर्मा यांनी संशयित आरोपींना पुढील सात दिवस पोलीस कोठडी मंजूर केली. संघटित गुन्हेगारी आहे,यापर्यंत पोलीस तपास येऊन पोहचला आहे. चांदवड येथून ताब्यात घेतलेल्या तीघांपैकी सलमान अमानुल्ला खान हा अल्पवयीन असल्याचे समोर आल्यामुळे त्याला मोक्का कायद्यांतर्गत कारवाईतून वगळण्यात आले आहे. सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील अ‍ॅड. अजय मिसर यांनी युक्तीवाद केला.

सरकारी पक्षाचा युक्तीवाद
शस्त्रलुटीच्या गुन्ह्यामागे आंतरराष्ट्रीय टोळी असण्याची दाट शक्यता आहे. त्याबाबतचे धागेदोरे अद्याप हाती लागलेले नाही.
संशयित आरोपींमध्ये गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार जरी बद्रीनुजमान सुका पाचा असला तरी त्याने कुठल्या मोठ्या गुंडाच्या सांगण्यावरून हा कटकारस्थान रचला याबाबत तपास करणे.
या गुन्हयामागे संशयितांना कोणता आर्थिक फायदा झाला याचा तपास करणे.
शस्त्रसाठा इतक्या मोठ्या प्रमाणात लूटूत तो मुंबईच्या दिशेने वाहतुक करण्यामागे मोठा घातपात करण्याचा वाजवी संशय आहे. यानुसार माहिती मिळविण्यासाठी तपास करणे.

Web Title: Weapons loot case: Seven days police detention under mocca offence,accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.