रब्बीसाठी हवामान अनुकूल

By admin | Published: November 18, 2016 10:27 PM2016-11-18T22:27:14+5:302016-11-18T22:30:18+5:30

रब्बीसाठी हवामान अनुकूल

Weather is favorable for Rabbi | रब्बीसाठी हवामान अनुकूल

रब्बीसाठी हवामान अनुकूल

Next

जायखेडा : गहू-हरभऱ्याची पेरणी करण्याचे कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन जायखेडा : गहू व हरभरा लागवडीसाठी सध्या पोषक व अनुकूल वातावरण असल्याने या पिकांच्या पेरणीकडे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात कल दिसून येत आहे.
ब्राह्मणपाडे व परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी पूर्ण केली असून, गहू व हरभरा पिकाची पेरणी करण्यासाठी हवामान अनुकूल असून थंडीचा जोरही वाढला आहे. शेतकऱ्यांनी १५ डिसेंबरच्या आत गहू व हरभऱ्याची पेरणी करावी. तसेच बियाणे व खते खरेदी करताना काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी अधिकारी दिलीप कापडीस व मंडल कृषी अधिकारी अविनाश खैरनार यांनी केले आहे. परतीच्या पावसाने परिसरात दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील आशा पल्लवीत झाल्या आहेत .
ज्या शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी केली आहे त्यांची बियाणे, खते खरेदीसाठी लगबग दिसून येत आहे. मात्र ते खरेदी करताना शेतकऱ्यांनी काळजी घेणे अपेक्षित आहे . शक्यतो बियाणे व खते अधिकृत परवानाधारकांकडून खरेदी करावेत. बियाणे व खते खरेदी करताना शेतकऱ्यांनी पक्के बील अवश्य घ्यावे. यासाठी दुकानदाराकडे आग्रह धरावा. बिलावर बियाणे व खताचा लॉट नंबर, बॅच नंबर, उत्पादक कंपनीचे नाव, अंतिम मुदत आदि तपशील नमूद आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी . अनुभवास व पसंतीस उतरलेल्या वाणाचीच खरेदी शेतकऱ्यांनी करावी. केवळ संबंधित बियाणे विक्र ेता सांगतो म्हणून त्यांच्या भरवशावर बियाणे खरेदी करू नये. कोणत्याही परिस्थितीत किमान किमतीपेक्षा जास्त दराने गहू, हरभरा, कांदा व अन्य बियाणे खरेदी करू नये. गहू, हरभरा, कांदा व इतर बियाणांची पेरणी केल्यानंतर उगवणीबाबत तक्रार असल्यास पेरणीनंतर आठ दिवसांनी लेखी तक्र ार करावी, असे आवाहन संबंधित ्रअधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. तक्रार दाखल करताना बियाणे खरेदी पावतीची प्रत जोडावी. पेरणी करताना बियाणाची पिशवी खालच्या बाजूने फोडून त्यामधील थोडे बियाणे नमुना म्हणून जतन करून ठेवावे. तसेच बियाणाची पिशवी व त्यासोबतचे लेबल सांभाळून ठेवणे आवश्यक आहे. तक्रारीचे निरसन करण्यास याचा फायदा होईल बियाणे व खते खरेदी करताना पुरेशी काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी, अशी असे कृषी अधिकारी खैरनार यांनी
सांगितले. यावेळी सहायक कृषी अधिकारी देसले, ग्रामसेवक वाघ, सरपंच, उपसरपंच यांच्यासह परिसरातील शेतकरीबांधव उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Weather is favorable for Rabbi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.