शिक्षक परिषदेतर्फे वाचन प्रेरणा दिनानिमत्त वेबिनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 12:00 AM2020-10-12T00:00:09+5:302020-10-12T01:16:54+5:30

नाशिक : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या ग्रंथालय शिक्षक विभागातर्फे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधत गुरुवारी (दि.१५) दुपारी ४ वाजता शालेय 'ग्रंथालय वास्तव व भवितव्य' विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आले असून यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ग्रंथालय शास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र कुमार यांचे व्याख्यान होणार आहे.

Webinar on the occasion of Reading Inspiration Day by the Teachers Council | शिक्षक परिषदेतर्फे वाचन प्रेरणा दिनानिमत्त वेबिनार

शिक्षक परिषदेतर्फे वाचन प्रेरणा दिनानिमत्त वेबिनार

googlenewsNext
ठळक मुद्दे पुणे विद्यापीठाचे ग्रंथालय शास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र कुमार यांचे व्याख्यान

नाशिक : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या ग्रंथालय शिक्षक विभागातर्फे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधत गुरुवारी (दि.१५) दुपारी ४ वाजता शालेय 'ग्रंथालय वास्तव व भवितव्य' विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आले असून यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ग्रंथालय शास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र कुमार यांचे व्याख्यान होणार आहे.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी वाचन प्रेरणा साजरा करण्यात येतो. मात्र यावर्षी कोरोनामुळे वाचन दिनाचा सामूहिक कार्यक्रम शक्य नसल्याने या वेबिणारचे आयोजन करण्यात आले आहे. या वेबिनारमध्ये झूमच्या माध्यमातून सहभागी होता येणार आहे. तर ज्या वाचकांना लिंक उपलब्ध होऊ शकणार नाही, त्यांना युट्युबवरही वेबिनारचा आस्वाद घेता येणार असल्याची माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष विलास सोनार, उपाध्यक्ष विनोद भंगाळे, कार्याध्यक्ष शंकर घोरपडे व कार्यवाह जगदीश चित्ते यांनी दिली.

Web Title: Webinar on the occasion of Reading Inspiration Day by the Teachers Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.