सातव्या वर्षी संकेतस्थळाची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 02:02 AM2018-06-20T02:02:26+5:302018-06-20T02:02:26+5:30
औंदाणे : काही मुलांच्या अंगी जन्मजात हुशारी असते. केवळ त्यांच्या या हुशारीला योग्य दिशा देण्याची गरज असते. मूळची उत्राणे (ता. बागलाण) येथील रहिवासी असलेल्या व सध्या सटाण्यात वास्तव्यास असलेल्या आदिश्री अविनाश पगार हिने वयाच्या सातव्या वर्षीच संकेतस्थळाची (वेबसाइट) निर्मिती करत लक्षवेधक कामगिरी केली आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून तिने पाणीबचतीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

आदिश्रीने उन्हाळ्याच्या शालेय सुट्यांत आमीर खान व किरण राव प्रस्तुत ‘तुफान आलंया’ या पानी फाउंडेशनच्या कार्यक्र माने प्रेरित होऊन संकेतस्थळाची निर्मिती केली. या संकेतस्थळातून पाणी वाचविणे व पाण्याचे महत्त्व याविषयीचा संदेश आदिश्रीने छायाचित्रे व व्हिडीओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे.
वयाच्या पाचव्या वर्षापासून संकेतस्थळ बनविण्यासाठी लागणाऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेजचा अभ्यास तिने सुरू केला होता. तसेच संकेतस्थळ बनविण्यासाठी बी. ई. कॉम्प्युटर तृतीय वर्ष अभ्यासक्रमातील वेब प्रोग्रामिंगचे ज्ञान तिने अवगत केले. संकेतस्थळ बनविण्याचा खडतर प्रवास आदिश्रीने तिच्या कुशाग्र बुद्धिमत्ता व कठोर मेहनतीच्या जोरावर वयाच्या सातव्या वर्षी लीलया पार पाडला. पानी फाउंडेशनच्या टीमकडूनही आदिश्रीचे या उपक्र माबद्दल कौतुक करण्यात आले आहे. तसेच भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
तिला संकेतस्थळ बनविण्याची संकल्पना आई अंजली पगार यांच्याकडून मिळाली आणि वडील अविनाश पगार यांच्याकडून मार्गदर्शन लाभले. नानासाहेब निंबाजी पगार यांची आदिश्री ही नात आहे. लहान वयात मिळवलेल्या या यशाबद्दल व सामाजिक जाणिवेसाठी आदिश्रीचे समाजातून कौतुक होत आहे. संगणक क्षेत्रातील तज्ज्ञांनीही आदिश्रीच्या या कामगिरीबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.
आमीर खानला भेटण्याची इच्छा
४पाणी वाचविण्याच्या उपक्र माबरोबरच भविष्यात आमीर खान व किरण राव यांना भेटण्याची इच्छा आदिश्रीने बोलून दाखवली आहे. पानी फाउण्डेशनच्या काही निवडक व्हिडीओंचा समावेश या संकेतस्थळात करण्यात आला आहे. अभ्यासाबरोबरच अवकाशविषयी वाचन, पियानो वाजवणे, लिखाण करणे, विविध सामाजिक विषयांवर भाष्य करणे ही आदिश्रीची आवड आहे.
सदर संकेतस्थळाला भारताबरोबरच जगभरातील अमेरिका, जर्मनी, पेरू, सौदी अरेबिया व नेदरलॅँड या देशांतून भेट देण्यात आली आहे.