प्रवासात विवाहितेच्या दागिन्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 11:28 PM2019-02-08T23:28:44+5:302019-02-09T00:33:01+5:30
बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेचे ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना पंचवटीतील निमाणी बसस्थानकात गुरुवारी (दि़७) दुपारच्या सुमारास घडली
नाशिक : बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेचे ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना पंचवटीतील निमाणी बसस्थानकात गुरुवारी (दि़७) दुपारच्या सुमारास घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यातील स्मिता सुनील नवले (५६, रा़ गोदावरी बंगला, महावीर कॉलनी) या गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पंचवटीतील निमाणी बसस्थानकावर आल्या होत्या़ या ठिकाणी बसमध्ये बसण्यासाठी जात असताना गर्दीचा फायदा घेत एका संशयित महिलेने नजर चुकवून नवले यांच्या बॅगेतील पर्समधून ४० हजार रुपयांचे तीन तोळे वजनाची पोत व सात हजार रुपयांची रोकड चोरून नेली़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
बांधकामाचे साहित्य चोरणाºया दोघांना अटक
नाशिक : तपोवनरोडवर जयशंकर गार्डनजवळील एका सोसायटीत असलेले बांधकामासाठी साहित्य चोरणाºया दोघा संशयितांना भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे. महेंद्र लक्ष्मण जाधव (४०) व संतोष दादा साळवे (३८, दोघे रा. तलाठी आॅफिसशेजारी, वडाळा गाव, नाशिक) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. जाधव व साळवे हे दोघे संशयित हिरोहोंडा दुचाकीवरून (एमएच १५ बीए २२९४) वॉटर वेज साइड या बिल्डिंगखाली आले व तीन हजार रुपयांचे गजाचे तुकडे व लोखंडी पाईप एका गोणीत भरून चोरी करून नेत होते़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
जुगार खेळणाºया चौघांना अटक
नाशिक : सिडकोच्या दत्त चौकातील बुरकुले संकुलासमोर कल्याण टाइम जुगार खेळणाºया चौघांना अंबड पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित सचिन खलील शेख (२१, रा. ३५, कालिका पेट्रोलपंपाजवळ, भारतनगर, वडाळागाव) व
त्याचे तीन साथीदार गुरुवारी (दि़७) दुपारी सव्वा वाजेच्या
दत्त चौकातील बुरकुले संकुलासमोर असलेल्या रस्त्याच्या बाजूस रिक्षात बसून, कल्याण टाइम व डी मिलन नावाचा जुगार खेळत होते़ पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून संशयितांना ताब्यात घेऊन अटक केली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे़
पाइपलाइनरोडवर मोबाइल खेचला
नाशिक : फोनवर बोलत पायी जात असलेल्या इसमाचा मोबाइल पल्सरवरून आलेल्या तिघा संशयितांनी बळजबरीने खेचून नेल्याची घटना पाइपलाइन रोडवरील विनायका
हॉटेलसमोर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळच्या
सुमारास विकास रामदास नवसारे (आराध्या रेसिडेन्सी, गंगापूररोड) हे मोबाइलवर बोलत पायी जात
होते़ यावेळी पल्सरवरून आलेल्या तिघा संशयितांनी त्यांचा
मोबाइल खेचून नेला़ याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़