बुधवारचा बाजार भरला गणेशवाडीच्या मंडईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 10:14 PM2020-04-22T22:14:16+5:302020-04-23T00:14:27+5:30

नाशिक : दर बुधवारचा आठवडे बाजार अखेरीस बुधवारी (दि. २२) भरला खरा, मात्र महापालिकेने अनेक निर्बंध घातल्याने प्रथमच हा बाजार गणेशवाडीतील मंडईत भरला. अर्थात, यंदा नेहमीप्रमाणे आठवडे बाजाराला प्रतिसाद मिळाला नाही.

 Wednesday's market was full in Ganeshwadi's market | बुधवारचा बाजार भरला गणेशवाडीच्या मंडईत

बुधवारचा बाजार भरला गणेशवाडीच्या मंडईत

Next

नाशिक : दर बुधवारचा आठवडे बाजार अखेरीस बुधवारी (दि. २२) भरला खरा, मात्र महापालिकेने अनेक निर्बंध घातल्याने प्रथमच हा बाजार गणेशवाडीतील मंडईत भरला. अर्थात, यंदा नेहमीप्रमाणे आठवडे बाजाराला प्रतिसाद मिळाला नाही.
आठवडे बाजाराला महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काही अटी-शर्तींवर मान्यता दिली. त्यानुसार प्रत्येक दुकानदाराने मास्क लावणे , दोन दुकानदारांमध्ये किमान पाच मीटरचे अंतर, ग्राहकात दोन मीटर अंतर, दुकानदारांनी ग्लोज वापरावे, हॅँड सॅनिटायझर वापरावे या अटी घालण्यात आल्या होत्या. मात्र, आठवडे बाजारात अशाप्रकारच्या अटी न पाळणाऱ्या विक्रेत्यांना महापालिकेने पळवून लावले होते.
बुधवारी (दि. २२) आठवडे बाजार भरला, परंतु यंदा गोदाकाठी न भरता महापालिकेने गणेशवाडीतील भाजी मंडईत जागा करून दिली होती. त्यामुळे त्याठिकाणी विक्रेत्यांनी बाजार भरवला. नेहमीसारखा गोदाकाठी बाजार नसल्याने नागरिकांचा मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
 

Web Title:  Wednesday's market was full in Ganeshwadi's market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक