ग्रंथ सप्ताहात प्रश्नमंजूषा स्पर्धा

By admin | Published: February 17, 2015 01:28 AM2015-02-17T01:28:33+5:302015-02-17T01:29:27+5:30

ग्रंथ सप्ताहात प्रश्नमंजूषा स्पर्धा

Weekend competition in question week | ग्रंथ सप्ताहात प्रश्नमंजूषा स्पर्धा

ग्रंथ सप्ताहात प्रश्नमंजूषा स्पर्धा

Next

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित ग्रंथ सप्ताहात सोमवारी (दि.१६) प्रश्नमंजूषा स्पर्धा प. सा. नाट्यगृहात पार पडली. शहरातील विविध वयोगटातील नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्वानंद बेदरकर, सावानाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष गिरिष महाजन, डॉ. सरोज धारणकर, सचिव डॉ. गिरिष नातू यांनी यावेळी उपस्थितांना प्रश्न विचारले.
प्रश्नांची उत्तरे देताना उपस्थितांमध्ये चढाओढ दिसून आली. प्रत्येक स्पर्धकाला एक उत्तर दिल्यानंतर एक पेन याप्रमाणे बक्षिसाचे वाटप केले गेले. जास्तीत जास्त उत्तर देणाऱ्या अश्पाक पिंजारी, डॉ. कृष्णा शहाणे, सागर पवार, विलास पगार, प्रतिमा धोपावकर या पाच विजेत्यांची पुढची फेरी घेण्यात आली. त्यातून विजेतेपद मिळविलेले विलास पगार, प्रतिभा धोपावकर व डॉ. कृष्णा शहाणे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. (प्रतिनिधी)

Web Title: Weekend competition in question week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.