बेजमध्ये ज्ञानरचनावादावर आधारित आठवडे बाजार
By admin | Published: December 27, 2016 11:32 PM2016-12-27T23:32:55+5:302016-12-27T23:33:23+5:30
बेजमध्ये ज्ञानरचनावादावर आधारित आठवडे बाजार
कळवण : नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या जुनी बेज येथील अभिनव बालविकास मंदिर व महत्मा फुले विद्यालयात ज्ञानरचनावादावर आधारित आठवडे बाजार संकल्पना अंमलात आणण्यात आली. विद्यार्थ्यांनी यात बाजारातील आर्थिक व्यवहार आत्मसात केले.
नवी बेज, जुनी बेज, भादवण, गांगवण, भेंडी, बगडू, विसापूर, चाचेर आदि परिसरातील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत असून, या परिसरातील विद्यार्थ्यांनी स्वत:च्या शेतमालातून भाजीपाला या आठवडे बाजारात विक्रीसाठी आणला होता. शिक्षक तसेच पालकांनीही या आठवडे बाजारातून भाजीपाला खरेदी केल्याने विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळाले.जीवनकौशल्य व विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास होऊन एक आदर्श व सुजाण नागरिक घडविण्यासाठी विद्यालयात वर्षभरात विविध उपक्र म राबविण्यात येतात. या पार्श्वभूमीवर विद्यालयात नुकताच बालआनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला. बालआनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खरेदी-विक्र ी, नफा-तोटा तसेच मालाची साठवणूक, नियोजन, विक्री व्यवस्था याबाबत व्यावहारिक ज्ञान मिळाले. मेळाव्यात भाजीपाला, कटलरी इ. जवळपास ७० ते ७५ विविध विक्री दुकानांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यालयातील पहिली ते दहावीपर्यंतच्या या मुलांनी या आठवडे बाजाराच्या माध्यमातून व्यावहारीक ज्ञान आत्मसात केले. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा त्यांना त्यांच्या ज्ञानातून मिळाला असल्याचे प्रतिपादन या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य बी. डी. रौंदळ यांनी केले.
याप्रसंगी पर्यवेक्षक बी. आर. सागर, शिक्षक विलास शेवाळे, नितीन पाटील, मीरा अहेर, देवीदास जाधव, कैलास हिरे, दीपक कापडणीस, भुसारे, गुरू गावित, सूरकर, हरी अहेर, लाडे, देशमुख, श्रीमती क्रांती देवरे, भोये, अहेर, जाधव, निकम आदि शिक्षकांनी परिश्रम घेतले. विद्यालयातील सर्व शिक्षक तसेच विद्यार्थी, पालकांनी बाजारात खरेदी केली. या उपक्रमाचे नवी बेज व जुनी बेज ग्रामस्थांनी स्वागत केले. (वार्ताहर)