आठवडे बाजार संकल्पनेला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:29 AM2020-12-14T04:29:51+5:302020-12-14T04:29:51+5:30
मुस्लीम समाजाचीही आरक्षणाची मागणी नाशिक : मुस्कलीम समाजातील विद्यार्थ्यांना तसेच नोकरीसाठी दहा टक्के आरक्षण मिळावे अशी मागणी करणारे निवेदन ...
मुस्लीम समाजाचीही आरक्षणाची मागणी
नाशिक : मुस्कलीम समाजातील विद्यार्थ्यांना तसेच नोकरीसाठी दहा टक्के आरक्षण मिळावे अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. समाजातील तरुणांना नोकरीत सामावून घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मुस्लीम समाज आरक्षण समितीच्या वतीने ही मागणी करण्यात आली आहे.
अनधिकृत खडीक्रशरवर लक्ष
नाशिक : जिल्ह्यात अनधिकृतपणे सुरू असलेले खडीक्रशर प्राधान्याने बंद करण्याची प्रक्रिया राबविण्याचे आदेश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. अनधिकृत खडीक्रशर बंद करण्याबरोबरच महसुली उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी खाणपट्टे लिलाव करण्याचा निर्णय मागील महिन्यातच घेण्यात आला होता.
मोतीबिंदू तपासणी शिबिर
नाशिक : ज्येष्ठ नागरिकांना मोतीबिंदूची समस्या प्राधान्याने भेडसावते, अशा नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी तसेच मोतीबिंदू तपासणी शिबिर रामोळे आय हॉस्पिटलकडून राबविले जात आहे. अल्पदरात मोतीबिंदू शिबिर घेतले जाणार असल्याने नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केेले आहे.
शुल्काबाबत पालकांची नाराजी
नाशिक : ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या शिक्षणसंस्थांनी पालकांना शुल्क भरण्याचे आवाहन करून शुल्क न भरल्यास ऑनलाइन अभ्यासक्रम बंद केला जाईल, अशी भूमिका घेतल्याने पालकांमध्ये नाराजी आहे. संस्थाचालक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हक्क हिरावून घेत असल्याची तक्रार पालकवर्गाकडून होत आहे. शाळांच्या भीतीने काही पालक पुढे येत नसल्याचे सांगण्यात आले.