कळवण तालुक्यात सप्ताहभर जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:15 AM2021-04-11T04:15:03+5:302021-04-11T04:15:03+5:30
यासंदर्भात कळवणचे सहायक जिल्हाधिकारी विकास मीना, तहसीलदार बी. ए. कापसे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल ...
यासंदर्भात कळवणचे सहायक जिल्हाधिकारी विकास मीना, तहसीलदार बी. ए. कापसे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल यांना निवेदन देण्यात आले. कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व व्यापारी महासंघाचे पदाधिकारी, संचालक यांची शासकीय नियमांचे पालन करून संयुक्त बैठक घेण्यात आली. त्यात १२ ते १८ एप्रिलपर्यंत सप्ताहभर जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला असून, प्रशासनाने या कालावधीत कडक धोरणाचा अवलंब करावा, प्रशासनाकडून कुणावरही अन्याय होणार नाही, अशी अपेक्षा बैठकीत पदाधिकारी व व्यापारीबांधवांनी व्यक्त केली. बैठकीत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंबादास जाधव, भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, व्यापारी महासंघाचे जयंत देवघरे, दीपक महाजन, सुधाकर पगार, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे, छावाचे तालुकाध्यक्ष प्रदीप पगार, जितेंद्र पगार, निंबा पगार, संदीप वाघ, गोविंद कोठावदे, बाबाजी वाघ, दीपक वेढणे, किशोर पवार, सचिन सोनवणे, चंद्रकांत बुटे, उमेश सोनवणे, संदीप पगार, उमेश सोनवणे, सागर खैरनार, रामदास देवरे, योगेश पवार आदी उपस्थित होते.
फोटो- १० कळवण जनता कर्फ्यू
जनता कर्फ्यूसंदर्भात कळवण येथील बैठकीप्रसंगी देवीदास पवार, महेंद्र हिरे, जयंत देवघरे, राजेंद्र भामरे, अंबादास जाधव, दीपक खैरनार, शशिकांत पाटील, दीपक महाजन, प्रदीप पगार, जितेंद्र पगार आदी.
===Photopath===
100421\10nsk_37_10042021_13.jpg
===Caption===
फोटो- १० कळवण जनता कर्फ्यू जनता कर्फ्यू संदर्भात कळवण येथील बैठकीप्रसंगी देविदास पवार, महेंद्र हिरे, जयंत देवघरे, राजेंद्र भामरे, अंबादास जाधव, दिपक खैरनार, शशिकांत पाटील, दिपक महाजन, प्रदीप पगार, जितेंद्र पगार आदी.