यशवंत मंडईतील गाळेधारकांना आठवड्याचा अल्टिमेटम, दुर्लक्ष करणाऱ्या थकबाकीदारांविरोधात आक्रमक पवित्रा

By Suyog.joshi | Published: April 5, 2024 03:53 PM2024-04-05T15:53:25+5:302024-04-05T15:53:48+5:30

रविवारपेठेतील यशवंत मंडईतील गाळेधारकांना नोटीस बजावूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या थकबाकीदारांविरोधात करसंकलन विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Weekly ultimatum to Yashwant market shop holders aggressive stance against defaulters | यशवंत मंडईतील गाळेधारकांना आठवड्याचा अल्टिमेटम, दुर्लक्ष करणाऱ्या थकबाकीदारांविरोधात आक्रमक पवित्रा

यशवंत मंडईतील गाळेधारकांना आठवड्याचा अल्टिमेटम, दुर्लक्ष करणाऱ्या थकबाकीदारांविरोधात आक्रमक पवित्रा

नाशिक : रविवारपेठेतील यशवंत मंडईतील गाळेधारकांना नोटीस बजावूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या थकबाकीदारांविरोधात करसंकलन विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या गाळेधारकांना आठवड्याचा अल्टिमेटम दिला आहे.
दरम्यान, २०१४ पासून या गाळेधारकांकडे १ कोटीचे भाडे थकीत आहे. पालिकेने सक्त होत गाळे सील करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यापूर्वी यशवंत मंडई ही इमारत जीर्ण झाल्याने महापालिकेने स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल समोर आल्यानंतर पालिकेने ही इमारत जमीनदोस्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

परंतु, भाडेकरूंनी पालिकेविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली असता न्यायालयात गाळेधारकांच्या विरोधात निकाल गेला. पुढे महापालिका प्रशासनाने या इमारतीमधील भाडेकरूंकडे असलेली १ कोटीची थकबाकी वसुलीसाठी पावले उचलली आहेत. तसेच जो कोणी पळवाट काढेल किंवा थकबाकी भरणार नाही, तर संबंधितांच्या मालमत्तेवर बोजा चढवला जाणार आहे. या इमारतीत तेवीस गाळेधारक असून, दहा वर्षांपासून १ कोटी भाडे थकले आहे. भाडे न भरणाऱ्यांचे गाळे सील केले जाणार आहेत. दरम्यान, रविवारी कारंजा येथील यशवंत मंडईच्या जागेवर बहुमजली पार्किंग उभारण्याचे नियोजन आहे. येथे पार्किंगची जागा नसल्याने वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी लवकरच ही इमारत पाडून तेथे बहुमजली पार्किंग उभारण्याचे नियोजन आहे.

गाळे रिकामे करण्याच्या सूचना
व्यावसायिकांना गाळे रिकामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तत्पूर्वी थकबाकी वसूल केली जाणार आहे. गाळेधारकांनी त्यांचे भाडे न भरल्यास गाळे सील करून त्यांच्या मालमत्तेवर थेट बोजा चढवला जाणार आहे. दरम्यान, भाडेकरूंनी महापालिकेकडे थकबाकी भरण्यासाठी पालिकेकडून मुदतवाढ देण्याची मागणी केली असता मनपाने मंगळ्वारपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

Web Title: Weekly ultimatum to Yashwant market shop holders aggressive stance against defaulters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक