भगूर  शहरातील आठवडे बाजाराची व्याप्ती वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:11 AM2018-11-22T00:11:27+5:302018-11-22T00:17:35+5:30

: शहरातील आठवडे बाजारात भाजीपाला, अन्नधान्य व छोट्या-मोठ्या गृहोपयोगी वस्तूंव्यतिरिक्त विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कपडे, सांैदर्यप्रसाधने मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येऊ लागल्याने आठवडे बाजाराची व्याप्ती वाढू लागली असून, बाजार नागरिकांच्या वस्तीपर्यंत पसरला आहे.

 Weeks of Bhagur city increased the scope of the market | भगूर  शहरातील आठवडे बाजाराची व्याप्ती वाढली

भगूर  शहरातील आठवडे बाजाराची व्याप्ती वाढली

Next

भगूर : शहरातील आठवडे बाजारात भाजीपाला, अन्नधान्य व छोट्या-मोठ्या गृहोपयोगी वस्तूंव्यतिरिक्त विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कपडे, सांैदर्यप्रसाधने मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येऊ लागल्याने आठवडे बाजाराची व्याप्ती वाढू लागली असून, बाजार नागरिकांच्या वस्तीपर्यंत पसरला आहे.  भगूरला दर मंगळवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात आजूबाजूच्या १५ ते २० खेड्यांतील ग्रामस्थ वर्षानुवर्षे खरेदीसाठी येतात. आठवडे बाजाराच्या जागेवर भरणारा बाजार आता आंबेडकर चौक, सुभाषरोड, क्र ांती चौक, घोलपरोड, सावरकरवाडा, टपाल कार्यालय, चिंचबन, मोरेवाडा, सावरकर उद्यान, ति. झं. विद्यामंदिर व सफाई कामगार चाळ ते दशक्रि या घाटापर्यंत पसरला आहे. आठवडे बाजारात खरेदी करणाºयांची संख्या व विविध वस्तू विकणारे विक्रे ते, शेतमाल व्यापारी, अन्नधान्य व्यापारी याचीदेखील संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
१ दरम्यान, शहरात शोरूम किंवा दुकानात मिळणारे चप्पल, बूट, लग्नाच्या साड्या, चामडी जाकेट, गरम उबदार कपडे, रेडिओ, टेपरेकॉर्डर, होम थिएटर, शेतकºयांना लागणारी लोखंडी अवजारे, महिलांची सौंदर्य प्रसाधने, मुलांची खेळणी, मोबाइल, घरघुती वापरायच्या वस्तू, आठवडे बाजारात अगदी कमी भावात मिळू लागल्याने दिवसेंदिवस बाजार फुलू लागला आहे.  २ गेल्या काही वर्षांत भगूर नगरपालिकेला जागा भाडे कर म्हणून ८ ते ९ हजार रु पये मिळायचा परंतु आज हाच कर १८ ते १९ हजार मिळत असल्याने पालिकेचे उत्पन्न आणि बाजाराचे महत्त्व पंचक्र ोशीत वाढले आहे.
३ भगूरचा आठवडे बाजार सकाळी १० वाजेला भरतो. सायंकाळी ५ वाजेपर्यंत किरकोळ व्यवसाय होतो, मात्र ५.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत लष्करी अधिकारी व जवान त्यांच्या पत्नी बाजारात आल्यावर मोठ्या प्रमाणात व्यवसाय होऊन योग्य तो भाव मिळतो, असे व्यावसायिकांनी सांगितले.
कमी दरात ताजा भाजीपाला
आठवडे बाजारात प्रारंभी भाजीपाला, अन्नधान्य, विविध फळे, चहा, वडापाव, भेळ, फरसाण, जिलेबी, ऊस रसवंती, प्लॅस्टिकच्या विविध प्रकारच्या वस्तू, जुने कपडे, शिराई, टोपले, मडके गाडगे आदी गृहोपयोगी वस्तू विक्र ीसाठी येत होत्या. शेतमाल अन्नधान्य व इतर वस्तू बाजारभावापेक्षा कमी दराने मिळत असल्याने याठिकाणी खरेदी करणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली.शेतातील ताजा माल मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिक परिसरातून येत असतात. भगूरमधील पूर्वीचा बाजारपेठ असलेला विशेष नावलौकिक सद्यस्थितीत राहिलेला नाही, तरीसुद्धा भगूरचा आठवडे बाजार हा पूर्वीपेक्षा अधिक जोमाने भरू लागला आहे. यामुळे नागरीवस्तीला त्रास होत आहे.

Web Title:  Weeks of Bhagur city increased the scope of the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार