आठवडे बाजारातून प्लास्टीक पिशव्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 02:38 PM2018-08-21T14:38:35+5:302018-08-21T14:39:19+5:30

ब्राह्मणगांव : ग्रामस्वछता अभियान अंतर्गत येथील सरपंच सरला अहिरे, ग्रामविकास अधिकारी प्रवीण बागुल व सदस्यांनी स्वत: गावातील सर्व किराना व अन्य दुकान व आठवडे बाजारात फिरून सर्व प्लास्टीक पिषव्या जप्त केल्या.

 Weeks seized plastic bags from the market | आठवडे बाजारातून प्लास्टीक पिशव्या जप्त

आठवडे बाजारातून प्लास्टीक पिशव्या जप्त

Next

ब्राह्मणगांव : ग्रामस्वछता अभियान अंतर्गत येथील सरपंच सरला अहिरे, ग्रामविकास अधिकारी प्रवीण बागुल व सदस्यांनी स्वत: गावातील सर्व किराना व अन्य दुकान व आठवडे बाजारात फिरून सर्व प्लास्टीक पिषव्या जप्त केल्या. पुढील काळात दुकानात प्लास्टीक पिशव्या मिळाल्या तर दंडात्मक कार्यवाहिचा इशारा दिला . सकाळी नऊ वाजता या अभियानास सुरूवात करण्यात आली . ग्रामपंचायती तर्फे सद्या स्वछता अभियान जोरात सुरु असून जनतेला प्लास्टिक बंदी व घर व घराचे आजूबाजूचा परिसर कसा स्वच्छ ठेवावा. याबाबत गावातील प्रत्येक चौकात मोठ मोठी मार्गदर्शक डिजिटल लावण्यात आली आहेत . गावात दररोज घंटा गाडीने ओला व सूखा कचरा दुरवर वाहून नेला जात आहे. तर पावसाळी गवतावर तननाशक औषधे व डास प्रतिबन्धक पावडर मारण्यात आली आहेत . स्वछतेसाठी जास्तीत जास्त लोकांना शौचालय बांधकाम करण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचे अहिरे यानी सांगितले.या प्रसंगी उपसरपंच विठाबाई खरे , माजी उपसरपंच माधव पगार , सुभाष अिहरे , कैलास अहिरे , विनोद अहिरे व अन्य सदस्य हजर होते .

Web Title:  Weeks seized plastic bags from the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक