चतुर्थश्रेणी कर्मचाºयाच्या माथी उद्यान निरीक्षकाचा भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 06:56 PM2017-08-03T18:56:40+5:302017-08-03T18:56:55+5:30
सिडको : येथील सहा प्रभागांमधील मनपाच्या ताब्यात असलेल्या सुमारे ३० हून अधिक उद्यानांतील वाढलेले गाजरगवत, धोकादायक असलेल्या झाडांच्या फांद्या कमी करणे, वाहतूक बेट तसेच दुभाजकातील स्वच्छता करणे, नवीन वृक्ष लावणे व दैनंदिन स्वच्छता राखणे आदी कामांसाठी महापालिकेच्या सिडको उद्यान विभागात पन्नासहून अधिक कर्मचारी असणे गरजेचे असताना सध्या हे सर्व काम तीन महिला कर्मचाºयांसह अवघे १४ कर्मचारी करीत आहेत. तर चतुर्थश्रेणी कर्मचाºयाच्या माथी उद्यान विभागाची प्रमुख जबाबदारी असलेल्या उद्यान निरीक्षकाचा भार देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सिडको प्रभागात एकूण सहा प्रभागमिळून २४ नगरसेवक आहेत. सहा प्रभागांचा समावेश असलेल्या एवढ्या मोठ्या भागात मनपाची एकूण ८० हून अधिक उद्याने असून यातील सुमारे ५० उद्यानांची खासगी ठेकेदारामार्फत (वरवर) देखभाल करण्यात येते. तरी अजून ३० हून अधिक उद्यानांची देखभाल करण्याची जबाबदारी ही मनपाच्या कर्मचाºयांकडे आहे. या कर्मचाºयांना उद्यानांमध्ये साचलेली घाण, वाढलेले गाजरगवत काढण्याबरोबरच उद्यानांची देखभाल करणे तसेच मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर असलेल्या पथदीपांवर, रस्त्याला अडथळा ठरणाºया फांद्या काढणे, वाहतूक बेट व दुभाजक स्वच्छता करणे आदी कामे प्रामुख्याने या विभागाने करणे गरजेचे असतानाही या विभागातील अधिकारी व कर्मचारी मात्र याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. उद्यानांची देखभाल करण्यासाठी ५० हून अधिक कर्मचारी मनपाकडे असणे गरजेचे असताना यासाठी अवघे १४ कर्मचारी हे काम करीत असल्याने त्यांच्याकडून हे कामकाज पूर्ण होत नसल्याचे सिडकोतील उद्यानांची दयनीय अवस्था झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून, सिडकोतील बहुतांशी ठिकाणच्या मुख्य रस्त्यांवरील झाडांच्या फांद्या वाढल्या असून, या फांद्यामुळे पथदीप झाकले गेले असल्याने रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरून अपघात होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे.