झोडगे येथे आग्रा-राजगड गरुडझेप मोहिमेचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:19 AM2021-08-25T04:19:22+5:302021-08-25T04:19:22+5:30
प्रमुख मावळ्यांच्या वतीने झोडगे येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. मोहिमेत सहभागी मावळ्यांचा ...
प्रमुख मावळ्यांच्या वतीने झोडगे येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. मोहिमेत सहभागी मावळ्यांचा सत्कार करण्यात आला. शिवभक्तांच्या वतीने या मोहिमेस निरोप देण्यात आला.
इन्फो...
काय आहे गरुडझेप मोहीम
आग्रा ते राजगड असा जवळपास १२५० किमी. अंतर १७ ते २९ ऑगस्ट २०२१ या १२ दिवसांत उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि शेवटी महाराष्ट्र अशा ४ राज्यांतून धावत पूर्ण करून एक अनोखा विक्रम या मोहिमेच्या माध्यमातून नोंदविण्यात येणार आहे. मुघल सम्राट औरंगजेबाने छत्रपती शिवराय यांना आग्रा येथे नजरकैदेत ठेवले होते आणि गनिमी काव्याने महाराज तेथून निसटले (१७ ऑगस्ट १९६६) व स्वराज्यात म्हणजेच राजगडावर सुखरूप पोहोचले, या घटनेला जवळपास ३५५ वर्षे पूर्ण होत आहेत. स्वराज्यातील शिवरायांचे विश्वासू पायदळ प्रमुख सरनोबत नरवीर पिलाजी गोळे यांचे १४ वे वंशज मारुती गोळे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली व जवळपास ५० मावळ्यांच्या उपस्थितीत ही मोहीम राबवली जात आहे.