स्वागत कमान कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 12:25 AM2020-09-10T00:25:51+5:302020-09-10T01:19:08+5:30
सिडको : लेखानगर ते राजीवनगर रोड येथे गेल्या अनेक दिवसांपासून दिशादर्शक कमान पडून असून, यामुळे महानगरपालिकेचा यासाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. महापालिकेने ही कमान त्वरित उभी करावी, अशी मागणी कैलास चुंभळे यांनी केली आहे.
लेखानगर ते राजीवनगर रस्त्यावर पडलेली स्वागत कमान.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिडको : लेखानगर ते राजीवनगर रोड येथे गेल्या अनेक दिवसांपासून दिशादर्शक कमान पडून असून, यामुळे महानगरपालिकेचा यासाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. महापालिकेने ही कमान त्वरित उभी करावी, अशी मागणी कैलास चुंभळे यांनी केली आहे.
महापालिकेच्या वतीने बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मुख्य रस्त्यांवर गावाचे नाव, रस्त्याची माहिती असलेल्या दिशा दाखविणाºया कमानी उभारल्या आहेत. लेखानगर येथे बसविण्यात आलेली कमान गेल्या अनेक दिवसांपासून खाली पडली असून, सर्वसामान्य नागारिक रस्त्याने येता-जाता सावलीचा सहारा म्हणून त्या कमानीवर बसतात. गेल्या आठवड्यात आलेल्या वादळी वाºयामुळे एक व्यक्ती या कमानीखाली अडकला. आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे महापालिकेने अन्य कमानींचीही सुरक्षितता तपासून पहावी तसेच ही कमान त्वरित दुरुस्त करावी, अशी मागणी केली जात आहे.