आॅनलाइन फटाके विक्रीवरील बंदी निर्णयाचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:48 AM2018-10-24T00:48:07+5:302018-10-24T00:48:42+5:30
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आॅनलाइन फटाके विक्रीवर पूर्णपणे बंदी लागू करण्यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणाच्या कालावधीतही रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्याची परवानगी दिली आहे.
नाशिक : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आॅनलाइन फटाके विक्रीवर पूर्णपणे बंदी लागू करण्यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणाच्या कालावधीतही रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे नागरिकांना फटाके फोडण्यासाठी केवळ दोन तासांचाच अवधी मिळणार असून, नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांना रात्री ११.५५ ते १२.३० वाजेपर्यंत वाजविता येणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने अशाप्रकारे फटाक्यांच्या विक्री व वापरावर निर्बंध घातल्याने पर्यावरणप्रेमींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर फटाके विक्रेत्यांनी निर्णय स्वागतार्ह असला तरी आवाजविरहित आणि सुरक्षित फटाके वाजविण्याला वेळ अधिक मिळायला हवा, असे मत व्यक्त केले. या दिवाळीला फटाके फोडता येणार असले तरी सुप्रीम कोर्टाने काही निर्बंध लादले आहेत. त्यानुसार सर्व अटींचे पालन करूनच फटाके फोडता येणार आहे. परवानाधारकांना फटाके विक्रीलाही न्यायालयाने परवानगी दिली आहे. मात्र आॅनलाइन फटाके विक्र ीवर बंदी घालण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार दिवाळीला रात्री ८ ते १० या वेळातच फटाके वाजवता येणार असून, इतर सणांना किंवा कार्यक्र मांनाही वेळेचा हाच नियम लागू असणार आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या रात्री ११.५५ ते १२.३० या वेळेतच फटाके वाजवता येणार आहे. फक्त पर्यावरणपूरक फटाक्यांना परवानगी देण्यात आली असून, आॅनलाइन फटाके विक्र ीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून मात्र सण, उत्सवांवर लादण्यात येणाऱ्या निर्बंधाविषयी नाराजी व्यक्त होत आहे.
सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय संपूर्णत: स्वागतार्ह आहे. पर्यावरण संवर्धनासाठी न्यायालयाने घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण असून, आता या निर्णयाची शासकीय यंत्रणांनी काटेकोर अंमलबाजवणी करण्याची गरज आहे.
- जगबीर सिंग, सदस्य, जिल्हा पर्यावरण समिती नाशिक
आॅनलाइन विक्री होणाºया फटाक्यांचे उत्पादन नक्की कोठे आणि कोणत्या निकषांनुसार होते. परवानाधारक उत्पादक त्यांची निर्मिती करतात की नाही याविषयी साशंकता असून, आॅनलाइनद्वारे चिनी फटाक्यांची बहुतांश विक्री होत असल्याने हे फटाके धोकादायक असतात. त्यामुळे आॅनलाइन संदर्भात न्यायालयाने घेतलेला निर्णय स्वागतार्हच आहे. फटाक्यांविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती होत असल्याने आवाजविरहित फटाक्यांनाच ग्राहकांची अधिक मागणी असून, असे फटाके वाजविण्याची परवानगी मिळायला हवी.
- जयप्रकाश जातेगावकर, अध्यक्ष, फटाका असोसिएशन, नाशिक.
फटाके फोडणे म्हणजे प्रदूषणाला आमंत्रण देणे आहे. त्यामुळे फटाक्यांवर पूर्णपणे बंदीच आणायला हवी. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आरोग्याला त्रासदायक आहे. देशात एकीकडे गरिबीमुळे भूकबळी जात असताना दुसरीकडे कोट्यवधींच्या फटाक्यांची जाळून राख करणे म्हणजे एक प्रकारचा उन्माद असून, अशाप्रकारे होणार कोट्यवधींचा चुराडा देशाला कधीही न परवडणारा आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशांनुसार प्रशासकीय यंत्रणेने बेकायदेशीर फटाके विक्रेत्यांसोबतच अतिरेकीपणाने मोठ्या आवाजाचे आणि धोकादायक फटाके वाजविणाºयांचा बंदोबस्त करणे आवश्यक असून देशवासीयांनी पर्यावरण आणि काळाशी सुसंगत विचार करण्याची गरज आहे. - प्राचार्य किशोर पवार, पर्यावरण तज्ज्ञ
सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजविणे आणि विक्रीसंदर्भात घेतलेल्या निर्णयाचे अंनिस
स्वागत करीत आहे. आता प्रशासनाने न्यायालयाच्या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करून ध्वनी व वायू प्रदूषण नियंत्रणासाठी कारवाई करणे गरजेचे आहे. दिवाळी हा प्रकाशाचा आणि दीपोत्सवाचा उत्सव आहे. फटाके वाजविण्याची भारतीय संस्कृती नाही, ही परंपरा चीनमधून आयात झाली आहे. त्यामुळे दिवाळी सणाकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहतानाच पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. - महेंद्र दातरंगे, जिल्हा कार्यवाह, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती