भारती पवार यांचे वणीत स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 07:24 PM2021-08-23T19:24:46+5:302021-08-23T19:26:11+5:30
वणी : आठ आदिवासी मंत्र्यांमध्ये एकमेव केंद्रीय मंत्रिपद जनता जनार्दनाच्या आशीर्वादामुळे मिळाले असून, मतदारसंघात विकासकामांबरोबर वणी परिसराचा कायापालट करणार असल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केले. वणी येथे मंत्रिपद मिळाल्यानंतर प्रथमच आगमन झाले. वणी येथील भारतीय जनता पार्टीतर्फे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

वणी ग्रामीण रुग्णालयात सुसज्ज ट्रामा केअर सेंटर कार्यान्वित करण्याची मागणी दिंडोरी तालुका भाजप उपाध्यक्ष व उद्योगपती महेंद्र पारख यांनी केली. वणी भाजप, दिशांतर सोशल ग्रुप, किसनलाल बोरा इंग्लिश मीडिअम, संताजी इंग्लिश मीडिअम, जगदंबा देवी ट्रस्ट, धान्य व्यापारी असोसिएशन, सुवर्णकार असोसिएशन व विविध मान्यवरांकडून पवार यांना सन्मानित करण्यात आले.
उद्योजक महेंद्र बोरा, किरण गांगुर्डे, प्रमोद भांबेरे, मयूर जैन, संतोष पगारिया, प्रशांत समदडिया, आबासाहेब देशमुख, रविकुमार सोनवणे, कैलास चोपडा, विलास कड, संजय वाघ, सुनील बर्डे, बाळू देशमुख , मधुकर आचार्य, कुंदन जावरे, प्रवीण दोशी, गोविंद थोरात, हितेश पारख, आचार्य प्रवीण बोरा, दर्शन पारख, हितेश पारख, नरेंद्र जाधव, सुधाकर घडवजे, भरत शिरसाठ, राजेंद्र थोरात, राकेश थोरात उपस्थित होते.