छत्रपती शिवाजी महाराजांच्या मशाल ज्योत यात्रेचे चांदवडला स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:17 AM2021-08-26T04:17:40+5:302021-08-26T04:17:40+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांची आग्य्राहून सुटका हे महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या आणि अगदी जगाच्या इतिहासालाही सोनेरी किनार लाभलेले इतिहासाचे पान आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराजांची आग्य्राहून सुटका हे महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या आणि अगदी जगाच्या इतिहासालाही सोनेरी किनार लाभलेले इतिहासाचे पान आहे. शिवाजी महाराज राजगडावर सुखरूप पोहोचले होते. तो दिवस होता १७ ऑगस्ट १६६६. आज घटनेला ३५५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने आग्रा ते राजगड, अशी गरुडझेप मोहीम राबवली जात आहे.
चांदवड येथील श्री रेणुका देवी मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमला होता. यावेळी सर्वांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर पुढील यात्रा किल्ले गडांवरील ज्योती पेटवून धाव घेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकार करत चांदवड ते नाशिक, असा प्रवास चालू केला आहे.
राजगडाच्या मातीचे पूजन करून योगेंद्र उपाध्याय व इतिहास संशोधक डॉ. सुमन आनंद यांच्या हस्ते शिवज्योत प्रज्वलित करून या मोहिमेची सुरुवात झाली होती. लाल किल्ल्याच्या प्रांगणात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळ्यासमोर सर्व मोहिमेतील सर्व मंडळींना स्थानिक मराठी बांधवांना भगवा फेटा घालून याची सुरुवात झाली. चांदवडचे प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, बाळासाहेब कासलीवाल, सचिन निकम, महेंद्र कर्डिले, देवा पाटील, योगेश अजमेरा, पिंटू रहाणे, पराग कासलीवाल, बाळा सोनवणे, कुणाल रहाणे, पप्पू कोतवाल, कुमावत, नितीन फंगाळ आदी उपस्थित होते.