कोरोना वॉरियर्स डॉक्टरचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 09:12 PM2020-05-04T21:12:07+5:302020-05-04T23:02:52+5:30

मालेगाव : येथील सामान्य रुग्णालयात गेल्या दीड महिन्यापासून कोरोना वारियर्स म्हणून काम करणाऱ्या डॉ. शुभांगी अहिरे या रविवारी त्यांच्या घरी परतल्या. यावेळी सटाणा नाका भागातील रहिवासी आणि त्यांच्या कॉलनीतील लोकांनी त्यांचे टाळ्यांच्या गजरात व फुले उधळत स्वागत केले.

 Welcome to Corona Warriors Doctor | कोरोना वॉरियर्स डॉक्टरचे स्वागत

कोरोना वॉरियर्स डॉक्टरचे स्वागत

Next

मालेगाव : येथील सामान्य रुग्णालयात गेल्या दीड महिन्यापासून कोरोना वारियर्स म्हणून काम करणाऱ्या डॉ. शुभांगी अहिरे या रविवारी त्यांच्या घरी परतल्या. यावेळी सटाणा नाका भागातील रहिवासी आणि त्यांच्या कॉलनीतील लोकांनी त्यांचे टाळ्यांच्या गजरात व फुले उधळत स्वागत केले.
तब्बल दीड महिन्यापासून डॉ. शुभांगी अहिरे-केदारे या कोरोनाबाधित रुग्णांच्या घशातील स्त्राव घेऊन तपासणीसाठी पाठवत. त्यामुळे त्यांना घरीही जाता येत नव्हते. आपल्या लहान मुलीशी केवळ व्हिडीओ कॉलिंंगवर त्या बोलत. तेव्हा ती ममा तू घरी कधी येशील म्हणून साद घालत. त्यावेळी त्यांना अश्रू आवरणे अशक्य होई.
घरी आल्यावर पती, सासू आणि मुलांनी तर स्वागत केलेच; पण कॉलनीतल्या लोकांनी केलेले स्वागत अविस्मरणीय होते. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. महिलांनी औक्षण केले. त्यावेळी त्यांना पुरते भरून आले. पिलं आईला बिलगावी तशी लहान मूल आईच्या कुशीत विसावली आणि दुसºया दिवशी पुन्हा डॉ. शुभांगी अहिरे या कोरोना वॉरियर
कोरोनाशी लढण्याकरिता सामान्य रुग्णालयात रुजू झाल्या.

Web Title:  Welcome to Corona Warriors Doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक