गोशाळा अधिकाराच्या निर्णयाचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:42 AM2021-01-08T04:42:26+5:302021-01-08T04:42:26+5:30
ग्रामीण भागात बिबट्याची भीती नाशिक : शहर परिसरालगत असलेल्या ग्रामीण भागात सातत्याने बिबट्याचे दर्शन घडत असल्याने नागरिकांमधील भीती कायम ...
ग्रामीण भागात बिबट्याची भीती
नाशिक : शहर परिसरालगत असलेल्या ग्रामीण भागात सातत्याने बिबट्याचे दर्शन घडत असल्याने नागरिकांमधील भीती कायम आहे. गेल्या काही महिन्यांपासून मानवी वस्ती असलेल्या शेतमळे तसेच गावांमध्ये बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांना भीतीच्या सावटाखाली वावरावे लागत आहे.
शहरात आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ
नाशिक : शहर परिसरात गेल्या पंधरवड्यात आत्महत्येच्या अनेक घटना घडल्या आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांपासून ते तरुण मुला-मुलींनी आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. किरकोळ कारणावरून अशाप्रकारे टोकाचे पाऊल उचलण्याच्या घटनांची संख्या यामध्ये अधिक आहे.
पोलिसांचे धाडसत्र झाले सुरू
नाशिक: अवैध धंद्यांवर कुणी कारवाई करावी, असा मुद्दा उपस्थित झाल्याने मंदावलेली कारवाई आता जोमाने सुरू झाल्याचे दिसते. अवैध धंद्यांवर पोलीस यंत्रणाच कारवाई करेल असे विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केल्यानंतर आता पोलिसांना गेल्या दोन दिवसांपासून अवैध धंद्याच्या विरोधात विशेष मोहीम उभारली आहे.
फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी
नाशिक : महात्मा जोतिबा फुले तसेच स्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी अनेक संघटनांनी केली आहे. राज्यात नुकताच महिला शिक्षण दिन साजरा करण्यात आला. यावेळी अनेक संस्था, संघटनांनी फुले दाम्पत्याला भारतरत्न पुरस्कार देण्याबाबातची मागणी केली. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी प्रलंबित आहे.
वसुलीसाठी मनपाची सुनावणी
नाशिक : घरपट्टी वसुलीसाठी महापालिकेने अभय योजना सुरू केली आहे. यासाठी शहरातील सातही विभागात थकीत वसुलीसाठीच मिळकतींची सुनावणीदेखील झाली आहे. सुनावणीनुसार महापालिकेला काही प्रमाणात महसूल मिळाला आहे. जास्तीत जास्त वसुलीसाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहे.
महात्मा गांधी रोडवर रस्त्यात दुचाकी
नाशिक : महात्मा गांधीरोडवर सम-विषम तारखेला चारचाकी, दुचाकी वाहनांसाठीचे नियोजन करण्यात आलेले आहे; परंतु प्रधान पार्कमध्ये असलेल्या मोबाइल दुकानदारांकडे येणाऱ्या ग्राहकांच्या दुचाकी या मोठ्या प्रमाणात उभ्या केल्या जात असून, अर्धा रस्ता या दुचाकीस्वारांनी व्यापला असल्याचे वाहतूक कोंडीचा प्रश्न उभार राहिला आहे. या वाहनांवर कारवाईची मागणी केली जात आहे.
स्त्यावरील दुकानांमुळे अडथळा
नाशिक : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या दहिपूल ते धुमाळ पॉइंट या मार्गावर अनेक विक्रेते हे रस्त्यावर दुकाने थाटत असल्याने वाहनांची कोंडी होते. हातगाडीवर फळ तसेच सौंदर्यप्रसाधने विकणाऱ्यांमुळेदेखील वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. येथील अनधिकृत विक्रेत्यांना हटविण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
१७ रोजी शहरात पल्स पोलीस मोहीम
नाशिक : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या वतीने महापालिका हद्दीत येत्या १७ जानेवारी रोजी पल्स पोलिओ मोहीम राबविली जाणार आहे. त्यादृष्टीने महापालिकेने तयारी सुरू केली असून, लोकप्रतिनिधींनीदेखील आपापल्या प्रभागात याबाबतची जनजागृती करणाारे फलक उभे केले आहेत.
महापालिका हटविणार धोकादायक फांद्या
नाशिक : महापालिकेचे विद्युतखांब तसेच रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या विस्तारल्या असल्याने विद्युतप्रवाहाला तसेच वाहनांनादेखील अडथळा होत आहे. अनेक नागरिकांच्या घरांवरदेखील झाडांच्या फांद्या गेलेल्या आहेत. या फांद्या तोडण्याची तयारी महाापालिकेने केली असून, यासंदर्भात कुणाच्या हरकती असतील तर त्या सात दिवसांत दाखल करण्याची मुदत देण्यात आलेली आहे.