लिंगायत समाज बांधवांकडून निर्णयाचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:43 AM2018-03-22T00:43:38+5:302018-03-22T00:43:38+5:30
कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने घेतलेल्या लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याच्या निर्णयाचे उत्तर महाराष्ट्र लिंगायत संघर्ष समितीने स्वागतकेलेअसून,नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच महाराष्ट्र सरकारनेही राज्यात लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्याची मागणीही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.
नाशिक : कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने घेतलेल्या लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याच्या निर्णयाचे उत्तर महाराष्ट्र लिंगायत संघर्ष समितीने स्वागतकेलेअसून,नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच महाराष्ट्र सरकारनेही राज्यात लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्याची मागणीही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. उत्तर महाराष्ट्र लिंगायत संघर्ष समितीने महाराष्ट्रातही लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता देण्याची मागणी केली आहे. कर्नाटकात लिंगायत समाजाची लोकसंख्या २१ टक्के आहे, तर महाराष्ट्रात जवळपास ९० लाख लिंगायत समाजाच्या नागरिक आहेत. या समाजाला १९३१ पर्यंत स्वतंत्र धर्माची मान्यता होती. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लिंगायत धर्माची स्वतंत्र ओळख पुसली जाऊन हिंदू लिंगायत अशी ओळख प्रचलित झाल्याचे संघर्ष समितीने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. कर्नाटक सरकाने घेतलेल्या निर्णयाचे महाराष्ट्रातही स्वागत करण्यात येत असून, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उत्तर महाराष्ट्र लिंगायत संघर्ष समितीतर्फे समाजबांधवांना पेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी समिती प्रमुख अनिल चौघुले, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर दंदणे, ओमप्रकाश कोयटे, अरुण आवटे, दुर्गेश भुसारे आदी उपस्थित होते. लिंगायत समाजाची लोकसंख्या कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आहे. भारताच्या मध्य भागात राहणाºया या समाजाने देशाच्या विकासासाठी नेहमीच मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे या समाजावर केंद्र सरकार व राज्य शासनाने अन्याय करू नये. तसेच त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी अपेक्षा समाजबांधवांनी व्यक्त केली.
नाशिक मध्ये २९ एप्रिलला मोर्चा
कर्नाटक सरकारच्या निर्णयानंतर महाराष्ट्रातही लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. लिंगायत समाजाच्या या मागणीसाठी उत्तर महाराष्ट्र लिंगायत संघर्ष समितीतर्फे २९ एप्रिलला नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती यावेळी लिंगायत समाजाच्या प्रतिनिधींनी दिली.
कर्नाटक सरकाने ज्याप्रमाणे लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही, असा निर्णय घेऊन लिंगायत समाजाला न्याय मिळवून द्यावा. महाराष्ट्रात स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळाल्यास समाजातील सर्व नागरिकांना अल्पसंख्याकांच्या सुविधांचा लाभ मिळणे शक्य होणार असल्याने लिंगायत संघर्ष समिती त्यासाठी आंदोलनात्मक पवित्रा घेणार आहे.
- अनिल चौघुले, प्रमुख, उत्तर महाराष्ट्र लिंगायत संघर्ष समिती
लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता मिळावी, ही संघर्ष समितीची अनेक दिवसांची मागणी आहे. त्यासाठी नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी नियमित आंदोलनेही करण्यात येत आहे. आता कर्नाटक सरकाने लिंगायतांना स्वतंत्र धर्माची मान्यता दिल्याने महाराष्ट्रातील आंदोलनालाही बळ मिळाले आहे. - नितीन हिंगमिरे, कार्यकर्ता, लिंगायत संघर्ष समिती