भगवान गंगा मधमेश्वर पायी दिंडीचे देवपूरला स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 06:01 PM2019-11-15T18:01:36+5:302019-11-15T18:02:11+5:30

सिन्नर : विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल अशा नामघोषात निघालेल्या नांदूरमधमेश्वर येथील भगवान गंगा मधमेश्वर पायी दिंडीचे प्रस्थान गुरुवारी सकाळी पूजा अर्चा करून आळंदीकडे झाले. या दिंडीचे देवूपर येथे उत्साहात स्वागत करण्यात आले.

 Welcome to Devpur to Lord Ganga Madheshwar Pai Dindi | भगवान गंगा मधमेश्वर पायी दिंडीचे देवपूरला स्वागत

भगवान गंगा मधमेश्वर पायी दिंडीचे देवपूरला स्वागत

googlenewsNext

पायी दिंडीचे सिन्नर तालुक्यातील मेंढी, खडांगळी, वडांगळी, निमगाव या गावांमध्ये भक्तीभावाने स्वागत करण्यात आले. त्यानंतर देवपूर येथे शुक्रवारी दिंडी दाखल झाली. डोक्यावर तुळशीवृंदावन खांद्यावर भगव्या पताका टाळ-मृदंगाचा निनाद मुखात हरिनामाचा गजर करीत भगवान गंगा मधमेश्वर पायी दिंडीचे देवपूर येथील गावात ग्रामस्थांनी स्वागत केले. यावेळी रस्त्यावर सडा-रांगोळी काढुन दिंडीचे स्वागत करण्यात आले. या दिंडीत शेकडोच्या वर नांदूरमधमेश्वर येथील वारकरी सहभागी झाले आहेत. देवपूर येथील जनाबाई पांडुरंग गडाख यांच्या निवासस्थानी दिंडी आल्यानंतर ह. भ. प. रोहिदास महाराज इकडे यांचे प्रवचन झाले. यावेळी ज्ञानेश्वर गडाख, मधुकर गडाख, नितीन गडाख, अर्चना गडाख, सुवर्णरेखा गीते, समर्थ गीते, आरु ष गडाख, दिंडीचे स्वागत केले. या दिंडीमधील वारकरी माधव महाराज गाजरे, जयराम गाजरे, रामदास इकडे, केशव गाजरे, पंढरीनाथ भिसे आदी वारकरी उपस्थित होते.
यावेळी श्रीकांत गडाख, सुखदेव गडाख, गोवर्धन रानडे, दिनेश गडाख, बाळासाहेब नरोडे, मुरलीधर नरोडे, विजय नरवडे, सुधीर गडाख, कचेश्वर गडाख, म्हाळु खोले , संदीप उगले यांनी वारकाऱ्यांचे स्वागत केले. दुपारी मध्यान्ह भोजनाचा लाभ घेऊन पायी दिंडी आळंदीकडे प्रस्थान झाले.

Web Title:  Welcome to Devpur to Lord Ganga Madheshwar Pai Dindi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.