जनआशीर्वाद यात्रेचे त्र्यंबकमध्ये उत्साहात स्वागत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:20 AM2021-08-18T04:20:44+5:302021-08-18T04:20:44+5:30
त्र्यंबकेश्वर : नवनिर्वाचित केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच त्र्यंबकेश्वर येथे ...
त्र्यंबकेश्वर : नवनिर्वाचित केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच त्र्यंबकेश्वर येथे आगमन झाले. त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली होती. स्वामी सागरनंद आश्रम व जुना आखाडा नीलगिरी पर्वतावरील सर्व साधूसंतांचे त्यांनी आशीर्वाद घेतले. यावेळी आखाडा परिषदेच्या वतीने त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
जव्हार फाटा येथे भाजप महिला आघाडीच्या वतीने औक्षण करून, फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत व त्यांचा सत्कार करण्यात आला. युवा मोर्चाच्या वतीने मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. भारती पवार यांनी त्र्यंबकेश्वरची ग्रामदेवता महादेवी मातेचे दर्शन घेतले व आरती केली. महादेवी ट्रस्टच्या वतीने स्वागत व सत्कार विश्वस्तांच्या वतीने त्यांचा करण्यात आला. त्यानंतर त्र्यंबकेश्वर तालुका भाजप कार्यालयाचे उद्घाटन डॉ. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आदिवासी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष आमदार अशोक उईके, जिल्हाध्यक्ष केदा आहेर, किशोर काळकर, लक्ष्मण सावजी, सुनील बच्छाव आदींसह तालुक्यातील भाजप कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. आदिवासी नृत्यावर ठेका धरत महिलांच्या नृत्यामध्ये डॉ. भारती पवार सहभागी झाल्या होत्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, वाल्मीक ऋषी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन करण्यात आले.
मंदिर बंद असल्याने त्र्यंबकेश्वराचे शिखर दर्शन घेतले. यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने तसेच पुरोहित संघाच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला. धनेश्वर महादेव मंदिर तीर्थराज कुशावर्त येथे गंगागोदावरी मातेची महाआरती करण्यात आली. त्र्यंबकेश्वर येथील सर्व कार्यक्रमाची रूपरेषा तालुकाध्यक्ष विष्णू दोबाडे, शहराध्यक्ष सुयोग वाडेकर यांच्यावर सोपविण्यात आली होती.
याप्रसंगी भाजपाचे पदाधिकारी तृप्ती धारणे, कमलेश जोशी, श्रीकांत गायधनी, पंकज धारणे, त्रिवेणी तुंगार, देवका कुंभार, सीमा झोले, हर्षल भालेराव, जयराम भुसारे, सुयोग शिखरे, विष्णू आचारी, बाळासाहेब अडसरे, रवींद्र सोनवणे, सचिन शुक्ल, समीर दिघे, विराज मुळे, अक्षय चव्हाण, बाळासाहेब कळमकर, मिलिंद धारणे, विजय शिखरे, गिरीश पन्हाळे, तेजस ढेरिंगे, रामचंद्र गुंड, प्रवीण पाटील, योगेश गंगापुत्र, भाऊसाहेब झोंबाड, आरती शिंदे, संगिता मुळे, सुनीता भुतडा, सुवर्णा वाडेकर, सुनीता सारडा, ज्योती भुतडा, वैष्णवी वाडेकर, देवश्री कुलकर्णी, सोनाली वाडेकर, संकेत टोके, पवन बोरसे, सतिश दुसाने, डाॅ. समीर महाजन, रमेश दोंदे, रवि माळी, गणेश मोरे, नीलेश पवार, गोपाळ झोंबाड, निशाद चांदवडकर, विजू पुराणिक, मयूर वाडेकर, भूषण दाणी, श्रीराज काण्णव, राकेश रहाणे, अंकुश परदेशी, नीरज शिखरे, रवींद्र गमे, राहुल वाव्हळ, तन्मय वाडेकर, पीयूष देवकुटे आदी उपस्थित होते.
चौकट...
नियमांची ऐशीतैशी...
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. डाॅ. भारतीताई पवार यांचे पालघरमार्गे रात्री ८ वा. आगमन होणार होते; पण रात्री पावणे अकरा त्या त्र्यंबकमध्ये दाखल झाल्या. महादेवी मंदिर, धनेश्वर मंदिर वगैरे दर्शन झाल्यानंतर कुशावर्तावर दर्शन आरती झाली. सध्या कुशावर्त तीर्थात स्नान करणे, आगमन करणे भाविकांना बंद असताना मंत्रिमहोदयांना कुशावर्त मोकळे करून दिले. रात्रीची संचारबंदी असताना रात्री १२ वाजता ढोल वाजवित मिरवणूक काढण्यात आली. याबाबतची चर्चा गावात सुरू होती. (१७ त्र्यंबक)
170821\17nsk_33_17082021_13.jpg
जन आशीर्वाद यात्रेचे त्र्यंबकमध्ये उत्साहात स्वागत !