चांदवड तालुक्यात जनजाती गौरव यात्रारथाचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 05:43 PM2018-12-31T17:43:01+5:302018-12-31T17:43:34+5:30
आदिवासी क्रांतिकारकांची गौरवगाथा दाखविण्यात आलेल्या जनजाती गौरव यात्रारथाचे चांदवड शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले.
शासनातर्फे राबविण्यात आलेल्या आदिवासी समाजासाठी व त्यांच्या विकासासाठीच्या योजनांची माहिती, आदिवासी समाजातील अनेक क्रांतिकारकांनी भारत देशातील व देशातील जंगलासाठी इंग्रजासोबत लढाई करून आपले हक्क कसे मिळविले यासंदर्भात या रथाद्वारे माहिती देण्यात आली आहे. चांदवड तालुक्यातील पारेगाव, हट्टी, धोेडंबे, आदिवासी होस्टेल चांदवड, देवीहट्टी राजदेरवाडी, मंगरूळ, खेलदरी आश्रमशाळा व वडनेरभैरव येथील आदिवासी वस्ती येथील आदिवासी बांधवांना जनजाती गौरव यात्रारथांतर्गत चित्रफितीद्वारे माहिती देण्यात आली. यात्रारथाचे उद्घाटन आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृह येथे करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुनील शेलार, पंचायत समिती सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, विलासराव ढोमसे, शहराध्यक्ष प्रशांत ठाकरे, राजदेरवाडीचे सरपंच मनोज शिंदे, अनु. जमाती तालुकाध्यक्ष संजय पाडवी, जिल्हा व्यापारी अध्यक्ष महेश खंदारे, पारेगावचे सरपंच मंगेश जेटे, सरपंच साईना कोल्हे आदी उपस्थित होते.