खङकमाळेगाव ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्र म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 07:14 PM2019-02-20T19:14:03+5:302019-02-20T19:15:13+5:30

वनसगांव : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने खङकमाळेगाव येथे वीर माता-पिता सन्मान सोहळयाचे आयोजन करण्यात आल होते. यावेळी चांदवड तालुक्यातील भायाळे गावचे सुपुत्र शंकर चंद्रभान शिंदे (शौर्यचक्र ) मराठा शहिद झाले होते, त्यांच्या माता सुमन शिंदे, वडील चंद्रभान शिंदे, बंधु केशव शिंदे व काका दादासाहेब शिंदे यांचा सन्मान करण्यात आला.

 Welcome to Khankamalega village | खङकमाळेगाव ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्र म

खङकमाळेगाव येथे शिवजयंतिनिमित्ताने वीर माता पितांचा सन्मान करतांना ग्रामस्थ.

Next
ठळक मुद्देवीर माता-पित्यांचा केला समारंभपुर्वक सन्मान

वनसगांव : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने खङकमाळेगाव येथे वीर माता-पिता सन्मान सोहळयाचे आयोजन करण्यात आल होते.
यावेळी चांदवड तालुक्यातील भायाळे गावचे सुपुत्र शंकर चंद्रभान शिंदे (शौर्यचक्र ) मराठा शहिद झाले होते, त्यांच्या माता सुमन शिंदे, वडील चंद्रभान शिंदे, बंधु केशव शिंदे व काका दादासाहेब शिंदे यांचा सन्मान करण्यात आला.
राष्ट्रपुरुषांच्या प्रतीमापुजन व मातीपुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मारुती चोळके यांनी शिवरायांचा दाहकता ईतीहास मांडला. याप्रसंगी दादासाहेब शिंदे यांनी शहिद नायक शंकर चंद्रभान शिंदे यांचा जीवन प्रवास सांगितला.
याप्रसंगी निवृत्ती शिंदे, विकास रायते, विठ्ठल कान्हे, कैलास रायते, राकेश रायते, तुकाराम रायते, पुरकर, नारायण रायते, धोंडिराम रहाणे, नाना शिंदे, संतोष रहाणे, जयवंत रहाणे, प्रताप राजोळे, नाना जाधव, अरुण रायते, शेखर शिंदे, राहुल शिदे, परशराम वारुळे, प्रविण शिंदे, काका रायते, विकास रायते, शरद रायते, प्रशांत पवार, कमलेश रायते, मनोज रहाणे, गणेश रायते, तुषार रायते, अक्षय पगार, जगदीश रायते, निलेश रायते, चेतन रायते, जयंत रायते, रोशन रायते, अभिजित रायते, दिपक चव्हाण, गंगाराम राजोळे, सुभाष रायते, बारकु रायते, धोंडिराम रहाणे, सागर शिंदे, नवनाथ रायते, सचिन रहाणे आदीे उपस्थित होते. दत्ता रायते यांनी आभाराचे मनोगत व्यक्त केले तर सागर रायते यांनी सुत्रसंचालन केले.
 

Web Title:  Welcome to Khankamalega village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Soldierसैनिक